आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 24 Sep 2021: या राशीच्या लोकांचा कुटुंबाशी संबंधित मोठा वाद संपुष्टात येईल, जाणून घ्या तुमचं आजचं राशिभविष्य

मेष: (Aries Horoscope)

भाग्य आज मेष राशीच्या लोकांचे जवळपास 60 टक्के साथ देईल. काही जाणांनी इतरांशी संवाद साधताना कडू भाषेचं रुपांतर गोड संवादात करण्याची कला शिकण्याची गरज आहे. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 23 Sep 2021: या राशीचे लोक कर्ज फेडण्यात यशस्वी होण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचं आजचं राशिभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

अशुभ ग्रह वृषभ राशीच्या लोकांविरुद्ध काम करू शकतात. त्यांना मुलांशी संबंधित निराशाजनक माहिती मिळण्याची शक्यता आहे. ते संध्याकाळ त्यांच्या प्रियजनांच्या सहवासात घालवू शकतात. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 22 Sep 2021: तूळ राशीच्या लोकांनी आज तोल सुटू देऊ नये; जाणून घ्या काय सांगतं तुमचं आजचं राशीभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीचे लोकांना आज समाधानी आणि शांतीपूर्ण दिवसाचा अनुभव येईल. भूतकाळात राजकारणात प्रयत्न केलेल्या काही लोकांना अखेर सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

कर्क: (Cancer Horoscope)

ग्रहांच्या युतित विध्न आल्यामुळे मौल्यवान मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. परंतु सतर्कता बाळगल्यास ते रोखता येऊ शकते. एखाद्या अशा व्यक्तिची भेट होऊ शकते जी त्यांना अजिबात आवडत नाही.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना आज राजकीय आणि सत्तेच्या क्षेत्रात त्यांच्या संबंधांचा फायदा होईल. जर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी व्यावसायिक मालमत्तेमध्ये पैसे खर्च करण्याचा विचार करावा.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना आनंद आणि अभिमान वाटेल कारण त्यांचे मूल अभ्यास आणि खेळ दोन्हीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. या राशीच्या काही लोकांना त्यांची प्रतिष्ठा वाढल्याची जाणीव होईल.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम संध्याकाळी पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही लोकांना एका भव्य सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळू शकते.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

नोकरी किंवा नातेसंबंधात एखाद्या अडचणीत सापडलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांना चंद्रमा मार्ग दाखवेल. काही लोक पगारवाढीशी संबंधित बातमीची अपेक्षा करू शकतात.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना आजच्या दिवशी भाग्य 94 टक्के पर्यंत साथ देऊ शकते. हे लोक वडील आणि जोडीदाराच्या रुपातील त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांचं आज घरात मन लागण्याची शक्यता कमी आहे. त्यांची कुठेतरी प्रवास करण्याची इच्छा असेल. हे लोक संध्याकाळी काही प्रियजनांना भेटू शकतात आणि एखाद्या पार्टीची योजना देखील आखू शकतात.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे. मृदुभाषी लोक त्यांचे सर्व कार्य पूर्ण करण्यात यशस्वी होतील आणि इतरांकडून आदर देखील मिळवतील.

मीन: (Pisces Horoscope)

कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेणारे किंवा परीक्षेला बसणारे मीन राशीचे लोक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. यांचा आजचा दिवस व्यस्त असू शकतो परंतु परिणाम सकारात्मक असतील.