आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 4 August 2021: या राशीच्या लोकांना हुशारीने केलेल्या गुंतवणुकीचं फळ मिळण्याची शक्यता; असं आहे आजचं राशीभविष्य

मेष: (Aries Horoscope)

आज मेष राशीचे लोक आपल्या जोडीदाराला सर्प्राइज करण्याचा प्रयत्न करू शकतात. काही लोक एक स्वादिष्ट डिश बनवण्याची शक्यता आहे. त्यांची संध्याकाळ खूप रोमँटिक असू शकते. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 03 August 2021: या राशीच्या लोकांनी नोकरी किंवा व्यवसायात सावधगिरी बाळगणे गरजेचे, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना आज आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवायला आवडेल. यांना आज अशा लोकांचे विचार त्रास देऊ शकतात जे लोक त्यांच्या पाठीमागे त्यांच्याविषयी वाईट बोलत असतात. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 2 August 2021: या राशीच्या लोकांचा पैशांचा प्रश्न सुटण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा?

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीचे लोक सध्या त्यांचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवीन प्रयोग करू शकतात आणि आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

कर्क: (Cancer Horoscope)

यांना आज विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. हे लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कंटाळवाणे वाटू शकते. यांनी गेल्या काही दिवसांत बरेच कामे आटोपली आहेत.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोक आज एका चांगल्या संध्याकाळचा आनंद घेऊ शकतात. ही संध्याकाळ ते त्याच्या जवळच्या लोकांसोबत घालवण्याचा प्रयत्न करतील आणि आपला तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतील.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक आज मानसिक शांतीच्या शोधात असतील आणि त्यांसाठी ते संगीताचा आधार घेऊ शकातात. ते आपली झोप पूर्ण करून पुन्हा ताजेतवाने होण्याचा प्रयत्न करू शकतात.

तूळ: (Libra Horoscope)

या राशीच्या ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना नफ्याची अपेक्षा असू शकते. तसेच त्यांना आज नवीन ग्राहक मिळण्याची शक्यताही आहे. जे नोकरी करतात त्यांना लवकरच पदोन्नतीची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

यांना आज कामाच्या ठिकाणी काही लोक त्यांच्या पाठीमागे त्यांच्याविषयी वाईट बोलत असल्याची माहिती मिळू शकते. यांनी या सर्व चर्चांकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.

धनु: (Sagittarius Horoscope)

गेल्या काही दिवसांत या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे परंतु तरीही ते मजबूत खांबासारखे स्थिर आहेत. यांनी निराश होण्याची आवश्यकता नाही, येणारा काळ त्यांच्यासाठी अनुकूल असू शकतो.

मकर: (Capricorn Horoscope)

एखाद्या प्रिय व्यक्तीशी वाद सुरू असेल तर तो सोडवण्याची आज उत्तम संधी असेल. तुमचा संवाद आज तुमच्यासाठी सर्वोपरि आहे आणि चुकूनही अपमानास्पद भाषेचा वापर करणे टाळा.

कुंभ: (Aquarius Horoscope)

एखाद्या मुद्द्यावरून कुटुंबातील एखाद्या सदस्याशी यांचे वाद होण्याची शक्यता आहे. हा वाद एखाद्या सामान्य मुद्द्यावरून होऊ शकतो. यांनी थंड डोक्याने समस्यांवर उपाय शोधायला हवा आणि इतरांना काय वाटते याकडे त्यांनी अजिबात लक्ष देऊ नये.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. यांना बाहेरून ऑर्डर केलेले जेवण आवडत असेल तरी त्यांनी ते मागवणे टाळावे. यांच्यासाठी घरी बनविलेले स्वच्छ आणि निरोगी अन्न हा सर्वात चांगला पर्याय असेल.