आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 22 July 2021: या राशीच्या लोकांच्या सापडतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना आज जवळच्या मित्राच्या कुटुंबातील सदस्यांचा रोष सहन करावा लागू शकतो. त्यांचा मोठा गैरसमज होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम राखावा लागेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 29 July 2021: कुंभ राशीच्या लोकांना आज मिळू शकते नशीबाची साथ; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस?

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना आनंदवार्ता समजतील. कुटुंबासोबत प्रवासाची संधी मिळू शकते. इच्छाशक्तीमुळे प्रगतीतील अडथळे आपोआप दूर होतील. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 28 July 2021: या राशीचे नशीब जवळपास 85% अनुकूल; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा?

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. शुभकार्यात कोणतीही समस्या येणार नाही. आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यावर घरगुती उपचार करू शकतात.

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना आज आपले पंख पसरण्याची मोठी संधी आहे. प्रयोग, योजना यशस्वी होतील. भाग्य उजळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोकांमध्ये आज कमालीचा उत्साह संचारेल. ऑफिसचं काम वेळेत पूर्ण करू शकाल. वरिष्ठांकडून शाबासकी मिळू शकते.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक आज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीसोबत एका संवेदनशिल मुद्द्यावर चर्चा करू शकतात. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अन्यथा वाद उद्भवू शकतो.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना आज कामाची पावती मिळण्याची शक्यता आहे. सर्वत्र त्यांच्या कामाचं कौतुक होईल. सामजिक प्रतिष्ठा मिळेल. नियमित व्यायाम किंवा योग करावा. आरोग्यास लाभदायक आहे.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशी लोकांचा आजचा दिवस कामातच जाईल. त्यांना रोमान्स करण्यासाठी देखील फुरसत मिळणार नाही. क्लाइंट्स आणि सीनियर्स सोबतच ते कामात व्यग्र राहातील.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांचा आज व्यापार-व्यवसाय जोरात चालणार आहे. बाजारात पत कायम राहील. लोकांचा विश्वास संपादन करू शकाल. भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार कराल.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशी लोक आज जुन्या आठवणीत रमणार आहेत. फॅमिलीसोबत आऊटिंगला जाण्याचा विचार करू शकतात. घरात आनंदी वातावरण राहील.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना आज आरोग्यविषयक समस्या भेडसावतील. काळजी घ्यावी लागेल. परदेशवारी संदर्भात वार्ता समजेल.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी जाईल. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. इतर व्यवसायात देखील नशीब आजमावू शकतात.