मेष: (Aries Horoscope)

घरात वाढत्या खर्चामुळे अलीकडच्या काळात मेष राशीच्या लोकांवर अतिरिक्त ताण पडणार आहे. काही लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते.Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 23 Oct 2021: 'या' राशीच्या लोकांना घर आणि ऑफिसात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल, वाचा आजचं राशीभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांनी कोणतेही काम घाईगडबडीत करण्याचा प्रयत्न करू नये. काम पूर्ण होणे तर सोडाच ते आणखी बिघडू शकते. प्रतिष्ठा आणि सामाजिक उंची वाढवण्याची संधी मिळेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 22 Oct 2021: 'या' राशीच्या लोकांना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल, वाचा आजचं राशीभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीचे लोक एखादा सेमिनार किंवा सार्वजनिक कार्यक्रमात सकारात्मक छाप सोडण्यास सक्षम राहतील. हातून शुभकार्य घडेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 21 Oct 2021: वृषभ राशीच्या लोकांना अतिरिक्त धन प्राप्ति होण्याची शक्यता, काय सांगतं तुमंचं आजचं राशीभविष्य?

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोक कुटुंबीयासोबत सहली जाण्याचा प्लॅन करू शकतात. शहराबाहेरील धार्मिक स्थळी जाऊ शकतात. कायदेशीर निकाल अपेक्षित असल्यास तो तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोक खूप कठीण वाटणारी कामे हाती घेण्यास मागे हटणार नाहीत. नोकरी आणि व्यवसायातील पुढाकारामुळे वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक लहरी असतात. ते आज एका वेगळ्याच विश्वात रमण्याची शक्यता आहे. ते खोडकर आणि खेळकर वागत असतील तर आश्चर्य वाटू नये.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांचा आज आत्मविश्वास वाढेल. गेल्या काही दिवसांपासून घेतलेल्या परिश्रमाचं फळ मिळेल. बढतीचे योग आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करू नका.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचे लोक त्यांना आवडणाऱ्या गोष्टींमध्ये दिवस घालवतील. काही जण संगीत ऐकण्यात तर काही स्वादिष्ट पदार्थ बनवण्यात वेळ घालवतील.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना आज परिश्रमाचं फळ मिळणार आहे. व्यावसायिक महत्त्वाकांक्षेचा भाग म्हणून योजनेचा सकारात्मक परिणाम जाणवेल. आवडता पदार्थ खायला मिळेल. जवळचा मित्र भेटेल.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीचे लोक वडिलोपार्जित मालमत्तेबाबत दीर्घ चर्चा करू शकतात. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यानं नोकरीच्या ठिकाणी कामाचा खूप व्याप असेल.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांची सहकाऱ्यांकडून आर्थिक फसवणूक होऊ शकते. सावध राहवे लागेल. विद्यार्थी देखील विचलित होतील. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानं अपेक्षीत यश मिळेल.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांचा आर्थिक व्यवहारातून जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल.