By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Darsha Amavasya 2022: दर्श अमावस्येला करा 'हे' अनुष्ठान; पितृदोष होईल दूर
Darsha Amavasya 2022: हिंदू पंचागानुसार (Hindu Panchang) दर महिन्याला कृष्ण पक्षाच्या (Krush paksha) अंतिम तिथीला अमावस्या (Amavasya) येते. हिंदू धर्मात (Hindu Dharma) अमावस्येला विशेष महत्व आहे.

Darsha Amavasya 2022: हिंदू पंचागानुसार (Hindu Panchang) दर महिन्याला कृष्ण पक्षाच्या (Krush paksha) अंतिम तिथीला अमावस्या (Amavasya) येते. हिंदू धर्मात (Hindu Dharma) अमावस्येला विशेष महत्व आहे. या दिवशी नदीत स्नान, दान कारण्याची परंपरा आहे. अमावस्येचा दिवस पितरांना समर्पित असतो. या दिवशी पितरांना पिंडदान, तर्पण (Pitra Dosha Upaya) आदी केले जाते. या दिवशी पितरांना तृप्त करण्यासाठी पूजाविधी देखील केली जाते. तुम्हाला पितृदोषाची (pitra dosha) समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 31 मार्च 2022 रोजी दर्श अमावस्या आहे. चला तर मग जाणून घेऊया माहिती.
हिंदू पंचागनुसार फाल्गुन महिन्यातील (Falgun month) दर्श अमावस्या (Darsha Amavasya) 31 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता सुरु होत 1 एप्रिल रोजी दुपारी 11:54 वाजेपर्यंत राहील. या दिवशी चंद्र पूर्णपणे नाहीसा होईल. ही अमावस्या परिवारातील मृत पूर्वजणांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी असते. या दिवशी श्रद्धा अनुष्ठान केल्यास मृत व्यक्तींच्या आत्म्यास शांती लाभते अशी मान्यता आहे.
पितृदोष दूर करण्यासाठी करा हे उपाय (Pitra Dosh Remedies)
पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून नदी किंवा तलावात पावित्र स्नान करावे. त्यानंतर पितरांच्या मुक्तीसाठी व्रत करावा. या व्रताची सुरुवात सकाळापासूनच होते. व्रताच्या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी गरीबांमध्ये वस्तूंचे दान करावे. यासह तीळदान करून श्रद्धा करावे. अशी मान्यता आहे की या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने लाभ मिळतो. या दिवशी निळे फुल, काळी तीळ आणि मोहरीच्या तेलाने भगवान शनिदेवाची पूजा करणे खूप लाभदायी ठरते. दर्श अमावास्येला हे धार्मिक उपाय केल्यास पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते. यासह परिवारात सुख शांती नांदते अशी मान्यता आहे.
(टीप : या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या