मुंबई: दसरा किंवा विजयादशमी (Vijayadashami 2021) हा सण अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी, नवमी तिथीला नवरात्री संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी शारदीय नवरात्री उत्सव 07 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाला आहे आणि 14 ऑक्टोबर 2021 रोजी संपेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी दसरा (Dasara 2021) सण साजरा केला जाईल. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रावण दहन (Ravan Dahan) करण्यात येते. तसेच दसऱ्याच्या दिवशी दिवशी शस्त्रांची पूजा (Shastra Pujan) करण्याची देखील परंपरा आहे. चला तर मग जाणून घेऊया दसऱ्याचा शुभ मुहूर्त. (Dasara 2021 Date: When is Vijayadashami? know the importance, shubh muhurta, Puja vidhi and Shastra Pujan metod)Also Read - Vijayadashami 2021 : कधी आहे विजयादशमी? रामायण आणि महाभारताचा काय आहे संबंध?

दसरा 2021 शुभ मुहूर्त (Dasara 2021 shubh muhurta)

अश्विन मास शुक्ल पक्ष दशमी तिथी आरंभ – 14 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6.52 पासून
अश्विन मास शुक्ल पक्ष दशमीची तिथी समाप्ती- 15 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 06.02 वाजता
विजय मुहूर्त – 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:21 पासून ते 03:07 पर्यंत Also Read - Ghatasthapana 2021: नवरात्रीत अशी करा घटस्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

दसऱ्याचे महत्त्व (Importance of Dasara)

धर्मग्रंथानुसार या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि लंका जिंकली. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. लोक वेगवेगळ्या प्रकारे दसरा साजरा करतात. या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. या दिवशी लोक शस्त्र पूजन आणि वाहन पूजन देखील करतात. याशिवाय काही लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवातही करतात. कारण नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. (Dasara 2021 Date: When is Vijayadashami? know the importance, shubh muhurta, Puja vidhi and Shastra Pujan metod) Also Read - Kojagari Pournima 2021: कधी आहे कोजागरी पौर्णिमा? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

दसरा पूजा विधी (Dasara 2021 Puja vidhi)

  • या दिवशी सकाळी उठल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.
  • सर्वप्रथम सर्व शस्त्रे स्वच्छ करून त्यांना पूजेसाठी एका ठिकाणी एकत्र करा.
  • त्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडून सर्व शस्त्रे पवित्र करा.
  • सर्व शस्त्रांवर हळद किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि फुलं अर्पण करा.
  • शस्त्राची पूजा करताना फुलांसह आपट्याचे पाणं देखील अर्पण करा.