Top Recommended Stories

Desi Ghee Uses : साजूक तुपाचा असा करा वापर; केसांना लाभेल मजबूती आणि चमक

पोषक तत्वांसाठी आहारात साजूक तूप वापरले जाते. असे या साजूक तुपाचे औषधी गुणधर्म देखील खूप आहे. साजूक तुपाच्या वापरामुळे (Desi Ghee For Hair) सुदृढ आरोग्यासह शरीराला व्याधींपासून दूर ठेवता येते.

Updated: February 24, 2022 2:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Desi Ghee Uses : साजूक तूपाचा असा करा वापर; केसांना लाभेल मजबूती आणि चमक

Desi Ghee Uses : भारतीय खाद्य संस्कृतीत साजूक तूपाला (sajuk tup) महत्त्व आहे. पोषक तत्वांसाठी आहारात साजूक तूप वापरले जाते. असे या साजूक तुपाचे औषधी गुणधर्म देखील खूप आहे. साजूक तूपाच्या वापरामुळे (Desi Ghee For Hair) सुदृढ आरोग्यासह शरीराला व्याधींपासून दूर ठेवता येते. यासह तुम्हाला माहीत आहे का केसांच्या समस्येवर (Hair problem) देखील साजूक तूप प्रभावी ठरतं. साजूक तूपाच्या वापराने केसांना फक्त चमकच येत नाही तर  मजबुती देखील मिळते. (sajuk tup benefits) यासह केसांच्या इतर समस्या देखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ साजूक तूपाचा केसांसाठी वापर कसा करावा.

Also Read:

तूप आणि लिंबू…

आपले केस सुदर आणि चमकदार असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी प्रत्येकजण काही न काही उपाय करता असतो. यासाठी महागडे तेल देखील काही जण वापरतात. पण, तुम्हाला माहित आहे का, घरात सहज उपलब्ध होणाऱ्या साजूक तूप आणि लिंबूच्या वापराने देखील केसांची समस्याच दूर केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एका वाटीत तूप घेत त्यात लिंबूचा रस मिसळून ते मिश्रण केसांच्या मुळांना लावा. कमीत कमी आर्धा तास हे मिश्रम केसांवर राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांना मजबुती मिळत चमक येईल.

You may like to read

साजूक तूप आणि नारळाचं तेल…

साजूक तूप आणि नारळाच्या तेलाचा वापर करत केसांना मजबूत आणि सुंदर केले जाऊ शकते. यासाठी तुम्ही एका वाटीत साजूक तूप आणि नारळ तेल मिसळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा 20 ते 25 मिनिटं हे मिश्रम केसांवर राहू द्या. नंतर साध्या पाण्याने केस धुवून घ्या. असे केल्याने केसांना खूप फायदा होतो.

या दोन पध्द्तीने साजूक तूपाचा केसांवर वापर केल्यास केसांची समस्या सुरू होते. यासह केसांना मजबूती मिळत कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती तसेच चमकदार केस लाभतात. सहज आणि कमी वेळात हा उपाय करणे शक्य असल्याने तुम्ही नक्की ट्राय करा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 24, 2022 2:00 PM IST

Updated Date: February 24, 2022 2:01 PM IST