मुंबई : कोकणासाह (Kokan) राज्यभरात सगळीकडे गौरी-गणपती (Gauri-Ganpati) सणाची धूम सुरू आहे. रविवारी गौराईचे आगमन झाले. लाडक्या गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कोकोणातील अनेक गावांमध्ये आजही पारंपारिक पद्धतीने सर्व प्रथा परंपरांचे पालन करत गौराईचे स्वागत केले जाते आणि तिचा पाहुणचार केला जातो. यावेळी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य, गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण कोकणात अनेक गावांमध्ये गौरीला तिखटाला म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य (gauri is offered non veg naivedya) दाखवला जातो.Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

गौरीच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही. महत्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात. Also Read - Ganesh Visarjan 2021: गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी, गणेशभक्तांना काळजी घेण्याचे आवाहन!

गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाडक्या गौरीसाठी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा कोकणातील अनेक गावांमध्ये जपली जाते. या तिखटाच्या नैवेद्यात नेमकं काय असतं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर गौराईसाठी मटण (Meat), चिकन (Chicken), चिंबोऱ्या (Crabs), मासे (Fish) यांचै नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी तर गौरीसाठी वाईन देखील ठेवली जाते. गौराईच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर सोडली जात नाही. Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

तिखटाचा नैवेद्य दाखवण्यामागची अख्यायिका –

असे सांगितले जाते की, पौराणीक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतिला आपले भूतगण दिले. हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवलं. तिचा चांगला पाहुणचार केला. गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना समशानात रहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली. त्यावेळी मांसाहार वर्ज असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती. तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले. या प्रसंगाची आठवण ठेऊन जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते. कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही. तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.