By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Vastu Tips : तुम्ही सुद्धा दुसऱ्यांच्या या गोष्टी वापरता का?, जीवनावर होईल वाईट परिणाम!
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, जीवनामध्ये आपल्याला चांगल्या सवयी असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपले आयुष्य चांगले राहते आणि त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही. दुसऱ्यांच्या वस्तू वापरणे हे आपल्या जीवनासाठी खूपच नकारात्मक आहे.

Vastu Tips : अनेकांना इतरांच्या वस्तू आवडतात. त्या वस्तू ते त्या व्यक्तींकडून मागतात आणि घालतात. काही लोकांना ही सवयी (Habits) कायम होऊ जाते. पण असे वागणे चांगले नाही. असे केल्याने आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम (negative effect on life) होऊ शकतो. या सवयी तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतात. वास्तु (Vastu) मान्यतेनुसार या गोष्टी चुकीच्या मानल्या जातात. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतरांनी वारल्या असतील तर तुम्ही कधीही वापरू नयेत…
Also Read:
शूजचा वापर (use of shoes) –
अनेकदा लोक इतरांचे शूज आणि चप्पल वापरतात. असे केल्याने घरात गरिबी येते असे म्हणतात. कारण पायांमध्ये शनीचे स्थान मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही इतरांचे बूट किंवा चप्पल घालून बाहेर गेलात तर शनीचा अशुभ प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो.
पेनचा वापर (use of Pen)-
काही लोकं इतरांकडून पेन घेऊन ते वापरतात. पण वास्तु मान्यतेनुसार पेनचा वापर केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय इतरांच्या पेनाचा वापर केल्यामुळे काही लोकांच्या करिअर, शिक्षण क्षेत्रातही नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.
अंगठी वापर (use of Ring) –
वास्तू मान्यतेनुसार, कधीही इतरांची अंगठी मागवून परिधान करू नये. यामुळे आरोग्य तर बिघडतेच पण जीवनावरही परिणाम होतो. इतरांची अंगठी घातल्याने आर्थिक परिस्थितीवरही नकारात्मक परिणाम होतो.
घड्याळाचा वापर (use of clock) –
इतरांचे घड्याळ कधीही वापरू नका. वास्तु मान्यतेनुसार घड्याळाचा संबंध जीवनाशी असतो. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट वेळ आली आणि जर तुम्ही त्या व्यक्तीकडून घड्याळ मागून घातलं तर ते तुमच्या आयुष्यात वाईट वेळ आणू शकते.