By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
दूधासोबत हे 4 पदार्थ खाणे ठरु शकते हानिकारक - Doodhasobat 4 Padarth Khane Tharel Hanikarak
Health Tips : दूधापासून आपल्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. दूधामध्ये असलेल्या मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे (Vitamin) दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपली हाडं मजबूत करण्यासाठी दूधाचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.

Health Tips : दूध (Milk) हे आपल्या शरीरासाठी किती गरजचे आहे हे सांगण्याची गरज नाही. दुधाला (Milk) आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आहे. दूध शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आपण लहानपणापासूनच आपल्या आजी आणि आईकडून दुधाचे महत्व (milk benefits) ऐकत आलो आहे. बऱ्याचदा डॉक्टर (Doctor) सुद्धा दूध पिण्याचा सल्ला देतात. दूधाला पूर्ण भोजन देखील मानले जाते. दूधापासून आपल्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. दूधामध्ये असलेल्या मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे (Vitamin) दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपली हाडं मजबूत करण्यासाठी दूधाचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. दूधामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील दूर होतात.
आपल्या चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे आपले आरोग्य बिघडू शकते असे तज्ज्ञ सांगतात. आपल्याला नाश्ता करताना किंवा जेवताना कोणतेही पदार्थ एकत्र खाण्याची सवय असते. पण अनेक पदार्थ अशापद्धतीने एकत्र खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. असेच दुधाच्या बाबतीत सुद्धा आहे. दूध पिताना थोडी सावधानगिरी बाळगणे गरजेचे आहेत. कारण असे काही पदार्थ आहेत जे दूध प्यायल्यानंतर किंवा दुधासोबत खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. कोण-कोणते पदार्थ दूध प्यायल्यानंतर खाऊ नये याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत…
दूधासोबत हे पदार्थ खाणं आजपासूनच टाळा –
1. मसालेदार पदार्थ (Spicy foods) –
प्रत्येकालाच चमचमीत आणि तिखट खाणं आवडतं. पण तुम्ही जर दूध प्यायले असेल आणि त्यानंतर तिखट पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते.
Trending Now
2. ब्रेड बटर (Bread Butter) –
नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खाणं सर्वांनाच आवडते. अनेक लोकं दूधासोबत ब्रेड बटर खातात. तुम्हाला दूध आणि ब्रेड बटर एकत्र खायला खूपच आवडत असेल किंवा चविष्ट लागत असेल पण याचे एकत्र सेवन करणे शरीरासाठी खूप हानिकारक होऊ शकते. यामुळे तुम्हाला उलट्या होऊ शकतात.
3. संत्रे (Orange) –
संत्रे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. पण असे असले तरी दूध आणि संत्रे एकत्र खाऊ नये. दूधामध्ये असलेले कॅल्शियम फळांमध्ये असलेल्या इंजाइम्सला शोषून घेतात. त्यामुळे शरीराला त्याचे पोषण मिळू शकत नाही. दूध आणि सत्रे खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसची समस्या उद्भवू शकते.
4. मुळा ( Radish)-
दूध प्यायल्यानंतर मूळा किंवा मूळ्यापासून तयार केलेले पदार्थ खाऊ नये. दूध प्यायल्यानंतर मूळा खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण असे केल्यामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या