मुंबई : हिंदू धर्मातला पवित्र श्रावण ( Shrawan 2021) महिना सध्या सुरू आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी ( Shrawan Somvar) महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चांगला जोडीदार लाभावा यासाठी अविवाहित महिला श्रावणात सोमवारी महादेवाची पूजा (Worship of Mahadev) करतात. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार (Shrawan Somvar 2021) असून पहिला सोमवार 9 ऑगस्ट रोजी होता. आता दुसरा श्रावण सोमवार (Dusara Shrawan Somvar 2021) 16 ऑगस्ट रोजी आहे. तिसरा सोमवार (Tisara Shrawan Somvar 2021) 23 ऑगस्ट रोजी, चौथा सोमवार 30 ऑगस्टला तर सप्टेंबर रोजी पाचवा श्रावण सोमवार असेल. चला तर मग जाणून घेऊयात श्रावणात दुसऱ्या सोमवारी पूजा कशी करावीAlso Read - Ghatasthapana 2021 Date: या दिवसापासून सुरू होतोय नवरात्रोत्सव; जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि पूजा विधी

श्रावण सोमवार पूजा विधी (Shravan Somwar Pooja Vidhi)

  • श्रावण सोमवारी लवकर उठून स्नान करावे.
  • मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक करावा.
  • माता पार्वती आणि नंदी यांनाही गंगाजल किंवा दूध अर्पण करावे.
  • पंचामृताने रुद्राभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावे.
  • शिवलिंगावर धोत्रा, भांग, चंदन, तांदूळ अर्पण करा आणि सर्वांना टिळक लावावे.
  • प्रसादाच्या रूपात भगवान शंकर यांना तूप आणि साखर अर्पण करावे.
  • धूप, दिवा लावून श्री गणेशाची आरती करावी.
  • शेवटी, भगवान शंकराची आरती करावी आणि प्रसाद वाटप करावा.

महादेवाची पूजा करताना ही खबरदारी घ्या (Precaution while worshiping Mahadev)

सोमवारी महादेवाची पूजा करताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. केतकी फुलांचा वापर भगवान शंकराच्या पूजेत करू नये. केतकीची फुले अर्पण केल्यास भगवान शंकर क्रोधित होतात, अशी मान्यता आहे. भगवान शंकराला तुळस देखील अर्पण केली जात नाही. तसेच शिवलिंगावर नारळाचे पाणी कधीही अर्पण करू नये. (Dusara Shrawan Somvar 2021 Puja Vidhi Take this precaution while worshiping Of Mahadev on second Shravan Somwar Pooja Vidhi) Also Read - Shrawan Somvar Pooja: पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे 4 उपाय, होईल अपेक्षित फळप्राप्ती

(डिस्क्लेमर : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही) Also Read - Shrawan Somwar 2021: श्रावण सोमवारच्या तारखा आणि शिवामूठीच्या महत्वाबद्दल घ्या जाणून!