मुंबई : अश्विन महिन्यातील शुल्क पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा (Dussehra 2021) साजरा केला जातो. यावेळी दसरा 15 ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या आला आहे. असे म्हटले जाते की, दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात सुख-शांती आणि संकटातून मुक्ती मिळते. या व्यतिरिक्त जर तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत काही चूका केल्या असतील आणि तुम्हाला या अपराधाचा त्रास होत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी काही उपाय (Dussehra Remedies) करु शकता. आज आम्ही तुम्हाला प्रायश्चित्तासाठी तीन उपाय सांगणार आहोत जे दसऱ्याच्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल.Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा

– जर तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल आणि तुम्हाला अपराधी असल्यासारखे वाटत असेल तर दसरा हा या चूकांमधून तुमची मुक्तता करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही माता कालीसमोर बसून तिचे ध्यान करा. माता कालीसमोर तेलाचा दिवा लावा आणि त्या तेलात 11 तीळ टाका. त्यानंतर तुम्ही केलेल्या चुकांबद्दल माता कालीची माफी मागा. असे मानले जाते की, असे केल्यामुळे तुम्ही केलेल्या चुका क्षमा केल्या जातात आणि माता काली प्रसन्न होते. Also Read - Dussehra 2021: रावण दहनच्या राखेपासून करा हे उपाय, रातोरात बदलेल तुमचे आयुष्य!

– दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या (Vijayadashmi) दिवशी पूजा केल्यानंतर कोणतीही वनस्पती घरी आणा आणि त्याची नियमित काळजी घ्या. असे म्हटले जाते की, आपल्या मनाचा त्रास किंवा संभ्रम त्या वनस्पतीसोबत शेअर केल्यामुळे मन हलके होते. जसजशी ही वनस्पती मोठी होत जाते तसतसे तुमचा त्रास कमी होऊ लागतो आणि घरात सुख आणि समृद्धी येते. Also Read - Mumbai Local Updates: यापुढे 18 वर्षांच्या आतील मुलांना रेल्वे प्रवास करता येणार, रेल्वे प्रशासनाकडून निर्णय जाहीर!

– जर तुम्हाला कोणत्याही चुकीमुळे ताण येत असेल तर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी पिठाचा चारमुखी दिवा लावा. हा दिवा शमीच्या झाडाखाली ठेवून दिवा पेटवा. एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की, हे करत असताना तुम्हाला कोणीही थांबवता कामा नये किंवा दिवा लावताना मागे वळून पाहू नका.