Top Recommended Stories

Egg Benefits For Women: वयाच्या 40 नंतर महिलांनी रोज खावीत अंडी, अनेक समस्यांपासून मिळेल आराम

अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. डॉक्टरही रोज एक अंडे खाण्याचा सल्ला देतात. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त आढळते. त्यामुळे मसल्स तयार होतात. विशेषतः 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश केला पाहिजे.

Published: January 18, 2022 1:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Recovering From Monkeypox? 5 Foods You Must Add to Your Diet For Quick Recovery
Eggs

Egg Benefits For Women : अंडी आरोग्यासाठी (Eggs for health) खूप फायदेशीर मानले जातात. डॉक्टरही रोज एक अंडे खाण्याचा सल्ला देतात. अंड्यांमध्ये प्रथिनांचे (Eggs are high in protein) प्रमाण खूप जास्त आढळते. त्यामुळे मसल्स तयार होतात. विशेषतः 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश (Included Eggs in diet) केला पाहिजे. अंडे सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर (Egg Benefits) असले तरी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी त्याचे फायदे (Egg Benefits For Women) जास्त आहेत.

Also Read:

आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना कार्यालयाबरोबरच घरातील कामेही करावी लागतात. अशा परिस्थितीत वृद्धापकाळाच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास दररोज एक अंडे (Daily One egg) तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते .

You may like to read

भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे (Plenty of vitamins) : अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडे आणि सांधे दुखतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे व्यक्तीला हळूहळू स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. वयाच्या 40 नंतर हा त्रास खूप वाढतो. अशा परिस्थितीत दररोज अंडी खाल्ल्याने यापासून सुटका मिळू शकते.

स्नायूंसाठी फायदेशीर (Beneficial for muscles) : प्रथिनांपासून स्नायू तयार होतात आणि अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. प्रथिने स्नायूंना मऊ आणि लवचिक बनवतात. अशा परिस्थितीत आहारात अंड्यांचा समावेश करा तसेच नियमित व्यायाम करा.

चयापचय वाढते (Increases metabolism) : वयाच्या 40 वर्षांनंतर शरीरातील मेटाबॉलिज्म कमी होऊ लागते. ही समस्या महिलांमध्ये अधिक दिसून येते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी आणि बी-12 च्या कमतरतेचा सामना करण्यासाठी अंडी खूप फायदेशीर ठरतात.

(डिस्क्लेमर : लेखात दिलला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 18, 2022 1:35 PM IST