मुंबई : शरीरात एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण कमी झाले तर अनेक आजार उद्भवू लागतात. असे एक पौष्टिक घटक आहे लोह . शरीरात लोहाचा (Iron in body) अभाव झाला म्हणजे थेट रक्ताचा अभाव (Iron Deficiency) झाला असा त्याचा अर्थ होतो. रक्तामध्ये ऑक्सिजन घेऊन जाणारे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह आवश्यक असते. आपल्या चयापचय प्रणालीमध्ये लोहाचा अभाव असतो तेव्हा आपल्या शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही. यावर (Food For Iron Deficiency) आयुर्वेद काय म्हणते ते जाणून घेऊयात…Also Read - Mayonnaise Benefits For Hair: केसाला मेयोनिज लावल्याने होतील अनेक फायदे, जाणून घ्या कसा करायचा वापर!

महर्षि आयुर्वेद रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौरभ शर्मा म्हणतात, “महिलांना लोहाची जास्त गरज असते. सामान्यत: त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता सहसा दिसून येते. यामुळे त्यांना थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, खराब झालेले केस आणि त्वचा, अनियमित हृदयाचा ठोके आदी लक्षणे दिसतात. लोहाच्या कमतरतेमुळेच अॅनिमिया आजार होतो”. Also Read - Coconut Milk Tea: नारळाच्या दूधाचा चहा कधी प्यायलाय?, नसेल प्यायला तर एकदा प्या होतील आरोग्यदायी फायदे!

त्यांनी सांगितले की, “आपले शरीर वनस्पती स्त्रोतांमधून केवळ 3 टक्के लोह आणि पशूंच्या स्रोतांमधून 15 टक्के लोह काढण्यास सक्षम आहे. म्हणूनच आपल्या शरीरला विशेषत: स्त्रियांच्या शरीराला लोहाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आयुर्वेदिक लोह पूरक आवश्यक असते. यामुळे लोहाची कमतरता दूर होते आणि अॅनिमिया आजार बरा होतो”. Also Read - Chana Dal Hair Mask: केस गळतीने आहात त्रस्त, मग लावा चण्याच्या डाळीचा हेअर मास्क!

महर्षि आयुर्वेदचे रुग्णालयाचे संचालक राम श्रीवास्तव यांनी सांगितले की, “लोहाची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या विशेषत: महिलांमध्ये दिसून येते. हेच अॅनिमियाच्या प्रमुख कारणांमधील एक आहे. लोह हे एक महत्त्वपूर्ण खनिज आहे जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी शरीराला मदत करते”.

लोहाची कमतरता असल्यास काय खावे?

  • लाल रंगाचे बीट लोहाची कमतरता त्वरित दूर करते. हिमोग्लोबिन वाढते. हे कोशिंबीर म्हणून दररोज खा.
  • फळांमधे डाळिंब उत्तम आहे. दररोज डाळिंबाचे सेवन करा किंवा ते त्याचा जूस करून सेवन करा.
  • दररोज ड्राय फ्रूट्स खाण्याची सवय लावा. ते अनेक पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असतात.
  • फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स इत्यादी बियाण्यांचे त्वरित सेवन सुरू करा.
  • गुळाचे सेवन करणे हा लोहाच्या कमतरतेवर मात करण्याचा देशी मार्ग आहे. रोज जेवणानंतर गूळाचे सेवन करा.