Gajanan Maharaj Prakatdin: 'दिगंबर अवस्थेत' झालं होतं गजानन महाराजांचं प्रथम दर्शन

'शेगावचा राजा' श्री संत गजानन महाराज (Shri Gajanan Maharaj) यांचा 144 वा प्रगटदिन बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने कीर्तन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रकट दिन खास आहे.

Updated: February 22, 2022 7:14 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Gajanan Maharaj Prakatdin: 'दिगंबर अवस्थेत' झालं होतं गजानन महाराजांचं प्रथम दर्शन

Gajanan Maharaj Prakat Din: ‘शेगावचा राजा’ श्री संत गजानन महाराज (Shri Gajanan Maharaj) यांचा 144 वा प्रगटदिन बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने कीर्तन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रकट दिन खास आहे. कारण यंदा गजानन महाराज यांच्या (Shegaon Gajanan Maharaj) प्रकटदिनाची तारीख आणि तिथी एकाच दिवशी आली आहे. विशेष म्हणजे हा योगायोग अनेक वर्षांनी जुळून आला आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. गजानन महाराजांचे प्रथम दर्शन केव्हा आणि कुठे झाले? याबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Also Read:

‘दिगंबर अवस्थेत’ झालं गजानन महाराजांचं प्रथम दर्शन

माघ वद्य सप्तमीला म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या शेगाव येथे श्री गजानन महाराज यांचे प्रथम दर्शन ‘दिगंबर अवस्थेत’ (विवस्त्र) झाले होते, अशा दंतकथा आहे. त्यामुळे हा दिवस श्री गजानन महाराज प्रकट दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ‘गण गण गणात बोते’चा जयघोष, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.

अचानक अवतरला एक तेजस्वी तरुण…

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात ‘शेगाव’ हे एक गाव आहे. शेगावात पातुरकरांचा घरी 23 फेब्रुवारी 1878 रोजी मुलाच्या ऋतुशांती सोहळा होता. कार्यक्रमात जेवण्याच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळी उकीरड्यावर फेकल्या जात होत्या. दुपारची वेळ झाली होती. उकीरड्याच्या शेजारी अचानक एक तेजस्वी तरुण अवतरला. फेकलेल्या पत्रावळीतील अन्न तो खात होता. तरुणाच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. त्यांच्याजवळ केवळ पाण्याचा तंबू आणि मातीची चिलम होती. तरुण अवलिया वाटत होता. तो आपल्याच तंद्पी तरुणाच्या चेहऱ्यावर अनोखे समाधान होते, शांती होती. तो कुठल्या तरी तंद्रीत होता. त्याचवेळी बंकटलाल अगरवाल आणि दामोदरपंत कुळकर्णी हे रस्त्याने जात होते. त्यांचे लक्ष त्या तेजस्वी तरुणाकडे गेले. तरुण कोणी विक्षिप्त असावा, असे दोघांना वाटले. पण, त्या तरुणाच्या मुद्रा बघून तो कोणीतरी साधुपुरुष असावा, असा विचार देखील त्यांच्या मनात आला. कदाचित त्याला भूक लागली असावी, त्यामुळे तो उष्ट्या पत्रावळ्यावरील अन्न सेवन करत असावा, असे बंकटलाल म्हणाले. त्यांनी तत्काळ पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणले आणि तरुणासमोर ठेवले. तरुणाला त्यांनी खाण्याचा आग्रह केला. तरुणाने सर्व पक्वान्ने एकत्र केले आणि नंतर ते सेवन केले. इतकेच नाही तर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी तो प्यायला. ‘अरे ते पाणी घाण आहे. ते पिऊ नको, असे दामोदरपंत कुळकर्णी म्हणाले असाता त्यावर तरुण म्हणाला…’घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे व पंच पक्वांन्ने दोन्ही एकच. सर्व सृष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजे परमेश्वर आणि पिणारा हा त्याहून वेगळा नाही, म्हणजे तो ही परमेश्वर.’

तरुणाचे हे वाक्य ऐकताच बंकटलाल यांना खात्री पटली, की हा तरुण वैरागी साधू पुरुष आहे. ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले. तोवर तो अदृश्य झाला. हे साधुपुरुष दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्री गजानन महाराज होय. तो दिवस होता माघ वद्य सप्तमीचा (23 फेब्रुवारी 1878). म्हणून या दिवशी गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो.

तेलंगी ब्राह्मण होते गजानन महाराज..

श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, असा उल्लेख बिरुदुराजू रामराजू नामक एका लेखकाच्या ‘आंध्रा योगुलु’ पुस्तकात आला आहे. गजानन महाराज गूढी, परमहंस संन्यासी, जीवनमुक्त असे महान संत होते. ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र त्यांनी दिला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 22, 2022 6:59 PM IST

Updated Date: February 22, 2022 7:14 PM IST