Top Recommended Stories

Gajanan Maharaj Prakat Din: कुठे आहे संत गजानन महाराजांची दुर्मिळ चिलम? जाणून घ्या एका क्लिकवर...

गजानन महाराजांची चिलम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूचे आवरण आहे. विशेष म्हणजे त्यावर घातूनच्या बारीक ताराचे सुंदर नक्षीकाम देखील आहे. विशेष म्हणजे या चिलमचा फोटो आणि संदर्भ 'दास भार्गव' यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोशामध्ये संशोधनात उल्लेख केला केला आहे.

Published: February 23, 2022 6:00 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Gajanan Maharaj Prakat Din: कुठे आहे संत गजानन महाराजांची दुर्मिळ चिलम? जाणून घ्या एका क्लिकवर...

Gajanan Maharaj Prakat Din: श्री संत गजानन महाराजांचा आज, 23 फेब्रुवारी 2022 रोजी 144 वा प्रगटदिन आहे. शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘श्रीं’चा प्रकट दिन (Gajanan Maharaj) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने कीर्तन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गजानन महाराज विनाविस्तव चिलम पेटवत असत. या संदर्भातच आम्ही आज गजानन महाराज प्रकटदिनी आम्ही आपल्यासाठी रंजक माहिती घेऊन आलो आहे. गजानन महाराजांची दुर्मिळ चिलम कुठे आहे. ती कोणी जपून ठेवली आहे, हे आपल्याला सांगणार आहोत.

Also Read:

गजानन महाराजांच्या दुर्मिळ चिलमची आजही होते पूजा…

श्री संत गजानन महाराज हे अवलिया होते. त्यांनी अनेक चमत्कार दाखवले होते. त्यांनी चांगल्या चांगल्यांचा अहंकार नष्ट केला होता. प्रेमाने जनावराला आपल्या वशमध्ये केले तर दीनदबळ्यांचे दुःख दूर केले. आपल्या भक्तांना पांडुरंगाचे दर्शन घडविले, तर भक्तांना मरणोन्मुख स्थितीतून बाहेर काढले. अशा प्रकारे चमत्कार दाखवणारे महाराज विनाविस्तव आपली चिलम पेटवत असत. त्यांची दुर्मिळ चिलम आकोट येथे आहे. नंदकिशोर वडाळकर यांनी ती श्रद्धापूर्वक जपून ठेवली आहे. श्रींच्या दुर्मिळ चिलमचे वडाळकर कुटुंबदर गुरुवारी या चिलीमची पूजा, अभिषेक करतात.

You may like to read

श्री गजानन विजय ग्रंथानुसार, गजानन महाराज सन 1909 मध्ये आकोट तालुक्यातील मुंडगाव येथे झ्यामसिंह राजपूत यांच्या घरी थांबले होते. तेव्हा महाराजांच्या सेवेत तल्लीन झालेल्या सेवेकरी भक्त विष्णुपंत गोविंद पाठक (मुंडगाव) यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महाराजांनी प्रसादाच्या रूपात आपली चिलम भेट दिली होती. विष्णुपंत पाठक यांनी निधनापूर्वी विश्‍वासू सहकारी त्र्यंबकराव वडाळकर यांच्याकडे ती 1978 मध्ये सोपवली होती.

साडे सहा इंच लांब आणि अष्टधातूचे आवरण…

गजानन महाराजांची चिलम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूचे आवरण आहे. विशेष म्हणजे त्यावर घातूनच्या बारीक ताराचे सुंदर नक्षीकाम देखील आहे. विशेष म्हणजे या चिलमचा फोटो आणि संदर्भ ‘दास भार्गव’ यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोशामध्ये संशोधनात उल्लेख केला केला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.