मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) 10 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील लोक हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. गणेशोत्सव प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. घरात गणपतीची स्थापना केली जाते. नृत्य, गायन आणि ढोल वाजवून गणपतीची मिरवणूक काढतात आणि आपापल्या श्रद्धेनुसार बाप्पाचे घरी थाटामाटात आगमन करतात. काही ठिकाणी गणपती दीड दिवस बसतात, तर काही ठिकाणी तीन दिवस, काही 5 दिवसांचा गणपती असतो. यानंतर गणपतीचे विसर्जन (Ganapati visarjan 2021) केले जाते. मात्र, सर्वाधिक लोक हे गणपतीचे विसर्जन 10 दिवसानंतरच करतात. गणेश चतुर्थीपासून (ganesh chaturthi 2021) 10 दिवसांनंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या (anant chaturdashi 2021) दिवशी बाप्पाचं (bappa visarjan) विसर्जन केले जाते. ‘गणपती बाप्पा मोरया (ganpati bappa morya), पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयजयकार करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो.Also Read - Anant Chaturdashi 2021: अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात का बांधला जातो 14 गाठींचा अनंत धागा? जाणून घ्या हे नियम

कधी आहे अनंत चतुर्दशी 2021 (Ganesh Visarjan 2021)

गणपती बाप्पाची 10 दिवस मनोभावाने सेवा केल्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाचे विसर्जन देखील वाजत गाजत केले जाते. यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबरपर्यंत (Ganesh Visarjan Time 2021) चालू राहील. Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ – 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 05:59 वाजता
अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती – 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 05:28 वाजता Also Read - Ganapati visarjan 2021: गणपती बाप्पाचे विसर्जन करताना 'या' मंत्रांचा जप करा, तुमच्यावर बाप्पाची कृपा कायम राहिल!

गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त (Ganapati visarjan muhurta 2021)

सकाळी मुहूर्त – दुपारी 7:39 ते 12:14 वाजेपर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 वाजेपर्यंत
संध्याकाळी मुहूर्त- संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46 वाजेपर्यंत
रात्रीचा मुहूर्त – मध्यरात्री 1:43 ते 3:11 वाजपर्यंत (20 सप्टेंबर)
सकाळी मुहूर्त – सकाळी 4:40 ते दुपारी 6:08 वाजेपर्यंत (20 सप्टेंबर)