Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या पूजेत आवश्य समाविष्ट करा या 5 गोष्टीं, लाडक्या बाप्पाला आहे खूपच प्रिय
Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या पूजेत आवश्य समाविष्ट करा या 5 गोष्टीं, लाडक्या बाप्पाला आहे खूपच प्रिय
Ganesh Chaturthi 2022 : यंदा बुधवारी 30 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. या गणेश चतुर्थीला तुम्ही गणेशाची पूजा करणार असाल तर पूजेत काही गोष्टी जोडणे आवश्यक आहेत.
Ganesh Chaturthi 2022: हिंदू मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य करण्यापूर्वी सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्मरण आणि पूजा केली जाते. यंदा बुधवारी 30 ऑगस्ट रोजी (Ganesh Chaturthi 2022 Date) गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. या गणेश चतुर्थीला तुम्ही गणेशाची पूजा (Ganesh Chaturthi Puja Vidhi) करणार असाल तर पूजेत काही गोष्टी जोडणे आवश्यक आहेत. या गोष्टी पुजेत समाविष्ट केल्या नाहीत तर (Ganesh Chaturthi 2022 Sbhubh Muhurt) बाप्पा तुमची पूजा स्वीकारणार नाही असे मानले जाते. त्यामुळे या गोष्टी तुमच्या पुजेत असणे आवश्यक आहेत. आज आम्ही तुम्हला श्री गणेशाच्या पूजेत कोणत्या वस्तू समाविष्ट कराव्या हे सांगणार आहोत.
Trending Now
गणपतीच्या पुजेत या गोष्टींचा करा समावेश
तुम्हा सर्वांना दुर्वा माहिती असेलच. गणपतीच्या पूजेच्या वेळी त्यांना दुर्वा अर्पण करणे आवश्यक असते. दुर्वा गणपतीला खूप असतात. त्यामुळे गणेश चतुर्थीला गणपतीच्या पूजेत दुर्वा नक्की समाविष्ट करा.
श्री गणेशाला मोदक खूप आवडतात. याशिवाय मोतीचूरचे लाडूही बाप्पाला खूप प्रिय आहेत असे मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी श्री गणेशाला मोदक आणि लाडू अवश्य अर्पण करावेत. या पदार्थांशिवाय श्री गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला सिंदूराचा तिलक लावावा. हे अत्यंत शुभ मानले जाते. गणेशजींना सिंदूर खूप आवडतो आणि त्यामुळे सिंदूरशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
श्री गणेशजींना फळांमध्ये केळी अत्यंत प्रिय आहे. गणेश चतुर्थीला श्री गणेशाला पूजेत केळी अर्पण करावी. परंतु लक्षात ठेवा की एक केळी अर्पण न करता केळीचा गुच्छ अर्पण करावा.
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला लाल फुले अर्पण करा. गणपतीला लाल फुले खूप प्रिय आहेत. या फुलांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञाशी संपर्क साधावा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर
लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा
इतरही ताज्या बातम्या
RECOMMENDED STORIES
More Stories
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.