हिंदू परंपरेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनानं केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजेचं विशेष महत्त्व आहे.Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

संपूर्ण वर्षभरात एकूण 24 गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) येत असतात. याचा अर्थ असा की, एका महिन्यात दोनदा गणेश चतुर्थी येते. पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी संबोधलं जातं. तर अमावस्येनंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणलं जातं. गणेश चतुर्थीला गणपतीला काय अर्पण करावं आणि काय करू नये, याबाबत आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे. पूजा करताना आपलं थोडंही चुकलं तर लाडला बाप्पा आपल्यावर रागावतो, चिडतो. Also Read - Ganesh Visarjan 2021: गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी, गणेशभक्तांना काळजी घेण्याचे आवाहन!

पांढरं वस्त्र आणि जाणवं अर्पण करू नये-

गणपतीची (Lord Ganesh) पूजा करताना चुकूनही पांढरं वस्त्र आणि जाणवं अर्पण करू नये. असं अशुभ समजलं जातं. याशिवाय तुम्ही जाणवं हळदीच्या पाण्यात पिवळं करून गणपतीला अर्पण करू शकतात. पिवळा रंग गणपतीला प्रिय आहे. पिवळे वस्त्र, फूल अर्पण केल्यानं गणपतील लवकर प्रसन्न होतात. आपली इच्छा पूर्ण करतात. Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

तांदळाची चूर अर्पण करू नका-

श्री गणेशाचा एक दंत अर्थात दात तुटलेला आहे, हे तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे गणेश पूजन करताना तांदळाची चूर अर्पण करू नका. तांदूळ अर्पण करताना ते थोडे ओले करून घ्यावे.

पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करा-

श्री गणेशाला (Lord Ganesh) पिवळा रंग प्रिय आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या चंदना ऐवजी पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करावे. गणराया टिळा लावल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना देखील चंदनाचा टिळा लावावा.

तुळशीपत्र अर्पण करू नये..

आपल्या लाडक्या गणरायाची आराधना करताना चुकूनही तुळशीपत्र अर्पण करू नये. याबाबत विशेष काळजी घ्यावी. तुळशी हे महालक्ष्मीची प्रतिक मानलं जातं. तुळशी ही भगवान विष्णुला प्रिय आहे. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक, लाडूचा नैवेद्य द्यावा.

केतकीचं पांढरं फूल अर्पण करू नये..

गणपतीला (Lord Ganesh) पांढरं फूल किंवा सुखलेलं फूल अर्पण करणे अशुभ मानलं जातं. असं केल्यानं कुटुंबावर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर गणरायाला केतकीचं फूल देखील अर्पण करू नये. केतकीचं फूल चंद्राचं प्रतिक आबे. चंद्रानं एकेकाळी गणरायाचा उपहास केला होता. त्यानंतर गणपतीनं चंद्राला शाप दिला होता. तेव्हापासून गणपतीला केतकीचं फूल अर्पण केलं जात नाही.