Top Recommended Stories

Ganesh Jayanti 2022: गणेश जयंतीला घरी आणा बाप्पाची ही मूर्ती, पैशांसोबतच आयुष्यातील अनेक समस्या होतील दूर!

Ganesh Jayanti 2022: गणेश जयंतीच्या दिवशी गणपत्ती बाप्पाची जन्म झाला होता. या दिवशी मनोभावने गणपती बाप्पाचे आगमन केले जाते त्याचप्रमाणे मोठ्या श्रद्धेने उपवास ठेवून बाप्पाची पूजा केली जाते.

Published: February 4, 2022 5:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Ganesh Jayanti 2022
Ganesh Jayanti 2022

Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) माघ महिन्यातील (Magh Month) जयंतीला 4 फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरुवात झाली आहे. माघ शुल्क पक्षातील चतुर्थी गणेश जयंती (Ganesh Jayanti 2022) म्हणून साजरी केली जाते. गणेश जयंती आणि विनायक चतुर्थीच्या (Vinayak Chaturthi) दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपत्ती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात केले जाते. असे म्हटले जाते की, गणेश जयंतीच्या दिवशी गणपत्ती बाप्पाची जन्म झाला होता. या दिवशी मनोभावने गणपती बाप्पाचे आगमन केले जाते त्याचप्रमाणे मोठ्या श्रद्धेने उपवास ठेवून बाप्पाची पूजा केली जाते. असे केल्यामुळ दु:ख दूर होतात.

Also Read:

शास्त्रानुसार देवघरात गणेशमूर्ती (Idol Ganesh) ठेवण्याचे काही खास नियम सांगितले गेले आहेत. देवघरात सम संख्येत म्हणजेच 2, 4, 6 या संख्येत गणेश मूर्ती ठेवावी. तसेच ती बसलेल्या स्वरूपात असावी. देवघरात उभी असलेली गणेशमूर्ती ठेवणे चांगले मानले जात नाही. गणेश जयंतीच्या निमित्ताने घराणध्ये कोणत्या प्रकारची बाप्पाची मूर्ती ठेवावी आणि त्यामुळे नेमके काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत….

You may like to read

अशाप्रकारची गणेश मूर्ती घरामध्ये ठेवा –

श्वेतार्क गणपती –
रुईच्या झाडाच्या मुळापासून बनवलेल्या श्वेतार्क गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्याने दृष्टीदोष, चेटूकची भीती राहत नाही.

पारद गणपती –
पारद दगडापासून तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. गणेशाच्या या रुपाची पूजा केल्याने जीवन आनंदी होते.

चंदनाचा गणपती –
चंदनाच्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

चांदीचा गणपती –
चांदीच्या गणेशमूर्तीची पूजा केल्याने जीवनात धन-संपत्ती कमी होत नाही. यासोबतच कर्जाचा प्रश्नही सुटतो.

मूंगा गणपती –
सिंदूर प्रवाळापासून तयार केलेल्या गणपतीची पूजा केल्याने शत्रूंची भीती नसते. यासोबतच तुम्हाला आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 4, 2022 5:00 AM IST