
Pune Ganesh Visarjan Miravnuk 2022 Live : पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणपतीचे विसर्जन
Ganesh Chaturthi 2022: संपूर्ण देशात गणेश उत्सव (Ganesh Utsav 2022) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा आणि भक्ती केली जाते तसेच त्यांना विविध प्रकारचे नैव्यद्य अर्पण केले जातात. गणेश चतुर्थीला गणपतींची स्थापना झाल्यानंतर 10 दिवस गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) उत्सव 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना (Ganpati Sthapana Muhurta) करतात. तुम्हीही या चतुर्थीला गणपती बाप्पाला घरात आणण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या बाप्पांच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त…
Pune Ganesh Visarjan Miravnuk 2022 Live : पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणपतीचे विसर्जन
Ashtavinayak Ganpati Ballaleshwar, Paali: पालीचा बल्लाळेश्वर आहे भक्ताचं नाव असलेला एकमेव अष्टविनायक गणपती
Pune Ganesh Visarjan 2022 : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम, मानाचा पहिला कसबा गणपती विसजर्नासाठी मार्गस्थ
गणेश चतुर्थी तिथी मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 03:34 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट बुधवारी दुपारी 03:23 वाजता समाप्त संपेल. यंदा गणपतींची स्थापना 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त 31 ऑगस्टला सकाळी 11:05 पासून सुरू होईल आणि 1 सप्टेंबर रोजी दुपारी 01.38 पर्यंत राहील.
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात.
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश.
गणपतीच्या मू्र्तीची स्थापना करताना सर्वप्रथम चौरंगावर गंगाजल शिंपडा आणि ते शुद्ध करा. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्यावर अक्षता ठेवा. यानंतर श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर ठेवा. आता गणपतीला स्नान घाला आणि गंगाजल शिंपडा. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी स्वरूपात सुपारी ठेवा. गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवा. दुर्वा आणि फळं, फूलं अर्पण करा. हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाची आरती करा. त्यानंतर गणेशजींच्या ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
Enroll for our free updates