मुंबई : सध्या सर्वांचा आवडता गणेशोत्सवस (Ganeshotsav 2021) सुरू आहे. देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या लाडक्या बाप्पाचं 10 दिवस वेगवेगळ्या नावाने पूजन केलं जातं. बाप्पाला कोणी ‘गणेश’ (Lord Ganesha) म्हणतं तर कोणी ‘एकदंत’ (Ekdant). कोणी ‘विनायक’ (vinayak) म्हणतं तर कुणी ‘गजानन’ (Gajanan). भक्तांचा लाडका बाप्पा (bappa) फक्त एकच ‘गणपती बाप्पा’ आहे. 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. दहा दिवस गणेश भक्त वेगवेळ्या पद्धतीने पूजा पाठ, भजन आणि कीर्तन असे कार्यक्रम करतात. या उत्सवाच्या निमित्ताने गणेश मंत्रांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या मंत्राने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात गणेश स्त्रोत्राचा मराठीतून अर्थ… (Ganesh Stotra Marathi Meaning: Recite Ganpati Stotra for Riddhi Siddhi and Samrudhi; Learn the meaning in Marathi)Also Read - Ganesh Visarjan 2021: लाडक्या गणपतीला असा द्या निरोप, जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजाविधी

नारद उवाच, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थ सिद्धये।।
नारद जी म्हणतात की, गौरी पुत्र गणपतीला आम्ही नतमस्तक होऊन प्रणाम करतो आणि आपली आयु, इच्छा आणि अर्थसिद्धीसाठी त्यांचे स्मरण करतो. Also Read - Shri Kshetra Padmalaya: एकाच गाभाऱ्यात गणेशाच्या दोन मूर्ती; येथे आहे महाभारतकालीन पद्मालय मंदीर

प्रथमं वक्रतुंण्डं च एकदन्तं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।
श्री गणेशाचे पहिले नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्णपिंगक्ष आणि चौथे गजवक्त्र आहे. Also Read - Ganpati Festival 2021: गणेशोत्सवात दररोज करा गणपती स्तोत्राचे पठण; आयुष्यात प्राप्त होईल सुख, समृद्धी आणि वैभव

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम्।।
गणपतीचे पाचवे नाव लंबोदर, सहावे विकट, सातवे विघ्नराजेंद्र आणि आठवे धुम्रवर्णम् आहे.

नवमं भालचन्द्रं च दशमं तु गजाननम्।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।।
गणपतीचे नववे नाव भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपती आणि बारावे गजानन आहे.

द्वादशैतानि नामामि त्रिसन्ध्यं य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो।।
जो कोणी भक्त तिन्ही सांजेला गणपतीची ही बारा नावे पठण करतो. त्याला कोणत्याही प्रकारच्या विघ्नाची भीती राहत नाही. तसेच हे नामस्मरण केल्याने सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात.

विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान्-मोक्षार्थी लभते गतिम्।।
जो विद्यार्थी गणपती स्तोत्र मंत्राचा जप करतो त्याला ज्ञान धन प्राप्त होते. त्याचप्रमाणे संपत्तीची इच्छा असणाऱ्यांना संपत्ती, आपत्यांची इच्छा असणाऱ्यांना आपत्य आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो.

जपेद गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय:।।
जो व्यक्ती गणपती स्तोत्राचा जप करतो त्याला सहा महिन्यांच्या आत अपेक्षित फळप्राप्ती होते आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होते.

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।
जी व्यक्ती हा मंत्र लिहून आठ लोकांच्या स्वाधीन करते, गणेशाच्या कृपेने तिला सर्व विद्या प्राप्त होतात.