Top Recommended Stories

Ganpati Mantra: बुधवारी करा 'या' मंत्रांचा जप, सर्व इच्छा होतील पूर्ण

Ganpati Mantra: बुधवारी श्री गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्यास संकटापासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार श्री गणपती बाप्पाचे काही मंत्र आहेत, ज्यांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील कष्ट दूर होत व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते.

Published: March 29, 2022 6:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Ganpati Mantra: बुधवारी करा 'या' मंत्रांचा जप, सर्व इच्छा होतील पूर्ण
Ganpati Mantra: कुठलेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने (Ganesh Pujan) होते. विघ्नहर्ता गणपतीसाठी (Lord Ganesha) बुधवारचा दिवस समर्पित आहे. बुधवारी श्री गणपती (Ganpati Bhagavan) बाप्पाची विधिवत पूजा (Puja vidhi) केल्यास संकटापासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार श्री गणपती बाप्पाचे काही मंत्र (Ganesh ji mantra) आहेत, ज्यांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील कष्ट दूर होत व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते. आम्ही या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की बुधवारी कोणत्या मंत्रांचा जप केल्याने विघ्न दूर होत मनातील इच्छा पुर्ण होतील.

या मंत्रांचा करा जप

ॐ नमोस्तु गणनाथाय, सिद्धिबुद्धि युताय च,
सर्व प्रदाय देहाय पुत्र वृद्धि प्रदाय च,
गुरुदराय गरबे गोपुत्रे गुह्यासिताय ते,
गोप्याय गोपिता शेष, भुवनाय चिदात्मने,
विश्व मूलाय भव्याय, विश्व सृष्टी कराय ते,
नमो नमस्ते सत्याय, सत्यपूर्णाय शुंडिने,
एकदं‍ताय शुद्धाय सुमुखाय नमो नम:,
प्रपन्न जन पालाय, प्रणतार्ति विनाशिने,
शरणंभव देवेश संततिं सुदृढ़ां कुरु,
भविष्यंति च ये पुत्रा मत्कुले गणनायक:,
ते सर्वे तव पूजार्थं नि‍रता: स्युर्वरोमत:,
पुत्र प्रदं इदंस्तोत्रं सर्वसिद्धि प्रदायक म.
या मंत्राचा जप बुधवारच्या दिवशी केल्यास तेजस्वी पुत्ररत्न प्राप्त होते अशी मान्यता आहे. यासह बल, बुद्धी आणि विवेक युक्त संतान प्राप्त होते. या मंत्राचा जप दररोज देखील करू शकतात. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते.
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः,
द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः,
विनायकश्चारुकर्णः पशुपालो भवात्मजः,
द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत्‌,
विश्वं तस्य भवेद्वश्यं न च विघ्नं भवेत्‌ क्वचित्‌.

विशेष मनोकामना पूर्तीसाठी मंत्र

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपती गुरु गणेश, ग्लौम गणपती, रिध्दी पती, माझे संकट दूर कर.
वर दिलेल्या मंत्रांचा जप केल्यास जीवनातील विघ्न-बाधा दूर होतात. यासह खोळंबलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होते.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Also Read:

You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या