मुंबई: संपूर्ण भारतात गणेश उत्सव (Ganesh Utsav 2021) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैव्यद्य अर्पण केले जातात. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) उत्सव 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. तुम्हीही गणपती बाप्पाला या चतुर्थीला घरात आणण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या बाप्पांच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त…(Ganpati Sthapana Muhurta)Also Read - Ganesh Visarjan 2021: गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी, गणेशभक्तांना काळजी घेण्याचे आवाहन!

गणपतीची स्थापना शुभ मुहूर्त (Ganpati Sthapana Shubh Muhurta)

गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर 2021 रोजी शुक्रवारी आहे. या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. हे लक्षात ठेवा की पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत असेल. त्यामुळे 10 सप्टेंबरला 12 वाजेनंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करू शकता. Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

गणपती विसर्जन कधी आहे? (When is Ganpati Visarjan)

या वर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी आहे. या दिवशी 10 दिवसांच्या गणपतीला निरोप दिला जातो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबरपर्यंत चालू राहील. Also Read - Ganapati visarjan 2021: गणपती बाप्पाचे विसर्जन करताना 'या' मंत्रांचा जप करा, तुमच्यावर बाप्पाची कृपा कायम राहिल!

गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त (Ganesh Visarjan Muhurta)

सकाळचा मुहूर्त – दुपारी 7:39 ते दुपारी 12:14 पर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त- संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46 पर्यंत
रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर) पर्यंत
सकाळचा मुहूर्त – 20 सप्टेंबर रोजी सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 पर्यंत

या मंत्रांचा करा जप (Ganesh Chaturthi Mantra)

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात.
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश..