गणपतीपुळे : रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेल गणपतीपुळे (Ganpatipule) हे गणपतीचे प्रसिद्ध तिर्थस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू (idol of Ganesha) आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात नैसर्गिक मूर्ती (Natural sculptures) आणि समोर अथांग अरबी समुद्र (Arabian Sea) ह्यामुळे गणपतीपुळे देवस्थान वेगळे ठरते. टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर असून मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. पश्चिम घाटाचा रक्षणकर्ता म्हणून ही मूर्ती पश्चिमाभिमुख असल्याचे सांगितले जाते. गणपतीची मूर्ती डोंगराला लागून आहे. त्यामुळे गणपतीला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते.Also Read - बार्ज ‘पी 305’ दुर्घटनेत आतापर्यंत 66 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले 5 जणांचे मृतदेह

गणपतीपुळेचे श्री गजानन मंदिर (Sri Gajanan Temple) समुद्रकिनाऱ्यावरील टेकडीच्या पायथ्याशी आहे. मंदिर लाल रंगाचे असून घुमटावर सोन्याच्या मुलाम्याचा कळस मंदिराची शोभा वाढवतो. सभामंडप सात नंदादीप तेवत आहेत. येथील श्री गणेशाची मूर्ती संपूर्ण दिसत नाही. केवळ दोन गंडस्थळे, नाभी व पुढे आलेले दोन दात दिसतात. भाद्रपद व माघ महिन्यात पाच दिवस येथे उत्सव साजरा केला जातो. चैत्र महिन्यात पाडव्यापासून संध्याकाळी मंदिरात वसंत पूजा सुरू असते. तर आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज दीपोत्सव साजरा केला जातो. Also Read - तॉक्ते चक्रीवादळाचा फटका! बघता बघता पाच मजली इमारत जमीनदोस्त, व्हिडिओ होतोय व्हायरल

गणपतीपुळेचे वैशिष्ये

गणपती म्हणजे गणांचा, लष्कराचा देव आणि पुळे म्हणजे वाळूचा किनारा यावरून या गावाला हे नांव पडले आहे. 1 किलोमीटर लांबीचा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे हे तिर्थस्थळ एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ देखील बनले आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा पाहण्यासाठी देखील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना देवदर्शन आणि पर्यटन असे दोन्ही अनुभव घेता येतात. Also Read - Cyclone Tauktae: बार्ज 'P-305'वरील 26 कर्मचाऱ्यांना जलसमाधी, 186 जणांना वाचवण्यात यश

गणपतीपुळेला कसे जावे? (How to Reach to Ganpatipule?)

मुंबईहून बोटीने किंवा एसटीने गणपतीपुळ्याला जाता येते किंवा पुण्याहून कोल्हापूरहून रत्नागिरीला मार्गे गणपतीपुळ्याला जाता येते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळेचे ऐतिहासिक महत्त्व (Historical significance of Ganpatipule)

छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शन घेऊन गेले होते असे देखील म्हटले जाते. माधवराव पेशवे यांनी येथे धर्मशाळा बांधली आहे. हरभट पटवर्धन यांनाही पेशवेकाळात या गणेशाच्या कृपेने उत्कर्ष प्राप्त झाला होता. सांगलीच्या राजांनी येथील सभामंडप बांधला आहे. छत्रपती राजाराम महाराज व बडोद्याच्या गायकवाड सरकारने या मंदिराला मोठया देणग्या दिल्या आहेत.

डिस्केलमर : लेखात दिलेला मजकूर ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही)