मुंबई : गरुड पुराण (Garuda Purana) हे वैष्णव संप्रदायाशी संबंधित महापुराण आहे. हे सनातन धर्मात (Sanatan Dharma) हे महापुराण मृत्यूनंतर मोक्ष देणारे मानले जाते. म्हणूनच सनातन हिंदू धर्मात मृत्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची प्रथा आहे. या पुराणाचे मुख्य देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, सद्गुण, निःस्वार्थ कर्तृत्वाच्या गौरवासह, बलिदान, दान, तपस्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सामान्य माणसाला प्रेरित करण्यासाठी अनेक वैश्विक आणि अलौकिक फळांचे वर्णन केले आहे. अशी कोणती कर्मे (Bad Habits) आहेत ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात दारिद्र्य येते, हे देखील या पुराणात सांगण्यात आले आहे. (Garuda Purana: According to Garuda Purana these 4 habits invite poverty Get away today)

घाणेरडे कपडे घालणे (Wearing dirty clothes): गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीने जर गलिच्छ आणि घाणेरडे कपडे परिधान केले तर माता लक्ष्मीची कृपा त्याच्यावर राहत नाही. माता लक्ष्मी अशा ठिकाणी नांदते जेथे स्वच्छता असते.

इतरांमध्ये दोष शोधणे (Finding fault in others) : गरुड पुराणानुसार जे लोक नेहमी इतरांमध्ये दोष शोधतात आणि इतरांबाबत वाईट बोलतात त्यांच्यावर देखील माता लक्ष्मी नाराज होते. यामुळे त्यांच्या जीवनात गरिबी येऊ शकते.

सकाळी उशिरापर्यंत झोपणे (Sleep late in the morning) : गरुड पुराणानुसार जी व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपते अशा व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रयत्नांनंतरही आयुष्यात नेहमी पैशांची कमतरता असते.

पैशाचा अभिमान बाळगणे (Proud of money): गरुड पुराण सांगते की एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या संपत्तीचा गर्व झाला तर अशा लोकांची बौद्धिक क्षमता कमकुवत होते. असे लोक निरुपयोगी गोष्टींवर पैसा खर्च करून गरिबीला आमंत्रण देतात.