नवी दिल्ली: शारदीय नवरात्री उत्सव (Navratri 2021)  07 ऑक्टोबरपासून (गुरुवारी ) सुरू होणार आणि 15 ऑक्टोबर पर्यंत असेल. यावर्षी दसरा (Dusshera 2021) हा सण शुक्रवार, 15 ऑक्टोबर रोजी राजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना असेही म्हणतात. घटस्थापनेला या उत्सवात विशेष महत्त्व आहे. घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, व्रत विधी आणि नियम जाणून घेऊयात..(Ghatasthapana 2021: Ghatasthapana Do it like this on Navratri; Know the Shubh Muhurta and pooja vidhi)Also Read - Bhaubeej 2021 Date : कधी आहे भाऊबीज? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Ghatasthapana Muhurta 2021)

शारदीय नवरात्रीची सुरुवात: 07 ऑक्टोबर, दिवस गुरुवार.
घाट स्थापना किंवा कलश स्थापना: 07 ऑक्टोबर रोजी.
घटस्थापना मुहूर्त: सकाळी 06.17 ते सकाळी 07.07 दरम्यान. Also Read - Lakshmi Pujan 2021 : कधी आहे महालक्ष्मी पूजन? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2021 Puja Vidhi)

  • सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडे पाणी घाला.
  • आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
  • त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसेच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
  • कलशाच्या आत आंब्याची पाने लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
  • देवीचे स्मरण करताना कलशाचे झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
  • कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
  • कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
  • दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
Also Read - Tulsi Vivah 2021 : कधी आहे देवउठनी एकादशी आणि तुळशीचे लग्न? पूजा करताना या गोष्टी ठेवा लक्षात