By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Viral Video: सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला मास्क लावला पण नंतर झाला पश्चाताप, रडून रडून अशी झाली तरुणीची अवस्था!
Viral Video: सुंदर दिसण्यासाठी या तरुणीने चेहऱ्याला असे काही लावले त्यामुळे तिला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.

Viral Video : सध्याच्या काळात सोशल मीडिया (Social Media) हे एक असे व्यासपीठ झाले आहे ज्याठिकाणी कधी काय पाहायला मिळेल यात नेम नाही. इथे कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात ज्यामुळे आपण भावूक होतो तर कधी काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसण्यावर नियंत्रण ठेवणेही कठीण होते. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ (Girl Video) तुफान व्हायरल होत आहे. सुंदर दिसण्यासाठी या तरुणीने चेहऱ्याला असे काही लावले त्यामुळे तिला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. या तरुणीच्या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.
View this post on Instagram
व्हायरल होणारा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. सुंदर दिसण्यासाठी या तरुणीने चेहऱ्यावर पील ऑफ मास्क ( लावल्याचे दिसत आहे. पण हे मास्क लावल्याने तिला नंतर खूप पश्चाताप झाला. चेहऱ्यावर मास्क लावल्यानंतर ही तरुणी मास्क काढायला गेली. पण मास्क काढण्याचा प्रयत्न करत असताना तिला खूप त्रास झाला. मास्क काढण्यासाठी तिला कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्यावी लागली. हा मास्क काढताना ती जोरजोरात रडताना दिसत आहे. या मास्कमुळे तिच्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान झालेले दिसत आहे. पण अखेर रडत रडत तिने चेहऱ्यावरचा मास्क काढला. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) व्हायरल होत आहे. punjabi_industry या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून यापुढे कोणीही चेहऱ्यावर पील ऑफ मास्क लावताना नक्कीच विचार करेल. सुंदर दिसण्यासाठी या तरुणीने जे काही प्रयत्न केले त्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला. या व्हिडिओवर नेटिझन्स भरभरुन कमेंट्स करत आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या