Top Recommended Stories

Gupt Navratri 2022 : बुधवारी सुरू होतीय वर्षातील पहिली नवरात्री, या 2 विशेष योगांमुळे वाढले महत्त्व

ही नवरात्र तंत्र-मंत्र आणि सिद्धी यासाठी खूप विशेष मानली जाते. या गुप्त नवरात्रीमध्ये तांत्रिक, साधक किंवा अघोरी लोक तंत्र-मंत्र आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी दुर्गा देवीची आध्यात्मिक साधना करतात. या नवरात्रीत मातेची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात अशी मान्यता आहे.

Published: January 29, 2022 10:24 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Chaitra Navratri 2022: Know Date, Days and Other Significant Details
Chaitra Navratri 2022: Know Date, Days and Other Significant Details

Gupt Navratri 2022 : नवरात्री वर्षात 4 वेळा येतात. यापैकी 2 गुप्त नवरात्री आणि 2 प्रकट नवरात्री (Prakat Navratri) असतात. चालू वर्ष 2022 मधील पहिली नवरात्र (first Navratri) 2 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या नवरात्रीतही दुर्गा देवीच्या (Durga Devi pooja) नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय तारा, त्रिपुर सुंदरी, भुनेश्वरी, छिन्‍नमस्ता, काली, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी या 10 महाविद्या (10 Mahavidya) देवतांचीही गुप्त पद्धतीने पूजा केली जाते.

Also Read:

अतिशय शुभ दोन योग
ही गुप्त नवरात्र खूप विशेष आहे. कारण यावेळी रवियोग (Raviyog) आणि सर्वार्थसिद्धी योग (Sarvarthasiddhi Yoga) हे दोन योग सोबत येत आहेत. या योगांमध्ये देवीची पूजा-अर्चाना केल्याने मिळणारे फळ अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. या गुप्त नवरात्रीमध्ये गुप्त पद्धतीने पूजा (Gupt Navratri 2022  puja vidhi) केली जाते. ही नवरात्र तंत्र-मंत्र आणि सिद्धी यासाठी खूप विशेष मानली जाते. या गुप्त नवरात्रीमध्ये तांत्रिक, साधक किंवा अघोरी लोक तंत्र-मंत्र आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी दुर्गा देवीची आध्यात्मिक साधना करतात. या नवरात्रीत मातेची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात अशी मान्यता आहे.

You may like to read

या गोष्टी ठेवा लक्षात
या गुप्त नवरात्रीत घटस्थापना (Ghatsthapana) केली जाते. यासोबतच देवीला लवंग आणि बत्तासे अर्पण केले जातात. श्रृंगार अर्पण केला जातो. यावेळी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त 2 फेब्रुवारी 2022, बुधवारी सकाळी 07:10 ते 08:02 पर्यंत आहे. या 9 दिवसांमध्ये कोणालाही न सांगता गुप्तपणे 9 दिवस सकाळी आणि संध्याकाळी देवीची पूजा करण्याचा प्रयत्न करा. यामुळे देवी सर्व दु:ख दूर करते आणि मनोकामना पूर्ण करते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 29, 2022 10:24 PM IST