By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Gupt Navratri 2022 : कधी आहे गुप्त नवरात्री? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
Gupt Navratri 2022 : वर्षातून चार वेळा नवरात्र येते. चैत्र आणि आश्विनमध्ये येणार्या नवरात्रीला प्रकट नवरात्र आणि माघ आणि आषाढमध्ये येणार्या नवरात्रीला गुप्त नवरात्र म्हणतात. यावेळी माघ महिन्यात येणारी गुप्त नवरात्र 2 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

Gupt Navratri 2022 Date : वर्षातून चार वेळा नवरात्र येते. चैत्र आणि आश्विनमध्ये येणार्या नवरात्रीला प्रकट नवरात्र आणि माघ आणि आषाढमध्ये येणार्या नवरात्रीला गुप्त नवरात्र (Gupt Navratri 2022) म्हणतात. यावेळी माघ महिन्यात येणारी गुप्त नवरात्र 2 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावेळी दुर्गे देवीच्या नऊ रूपांची पूजा (Gupt Navratri 2022 worship) केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री ही मातेची नऊ रूपे (Gupt Navratri importance) आहेत. यांची या नवरात्रीत पूजा केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये तारा, त्रिपुर सुंदरी, भुनेश्वरी, छिन्नमस्ता, काली, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी या दहा महाविद्या देवतांची गुप्तपणे पूजा केली जाते.
Also Read:
गुप्त नवरात्रीचे महत्व (Gupt Navratri 2022 significance)
असे मानले जाते की गुप्त नवरात्र अशा लोकांसाठी विशेष असते ज्यांच्यासाठी तंत्र साधना, जादूटोणा, वशिकरण इत्यादी गोष्टीचे विशेष महत्त्व असते. या नवरात्री दरम्यान हे लोक रात्री तंत्र सिद्धी (Gupt Navratri 2022 puja vidhi) करतात. त्यांच्या भक्ती आणि तपस्येने प्रसन्न होऊन देवी त्यांना शक्ती प्रदान करते.
हा काळ आहे विशेष (Gupt Navratri 2022 Special)
गुप्त नवरात्रीमध्ये यावेळी रवियोग आणि सर्वार्थसिद्धी योगाच्या रूपाने विशेष मुहूर्त येत आहेत. ज्यांना नवीन काम सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी हे मुहूर्त खास आहेत. घर खरेदी करणे असो, भूमीपूजन असो किंवा वाहन खरेदी असो या काळात सर्व शुभ कार्ये केले जातात. या काळात खरेदी किंवा गुंतवणूक करणे फायदेशीर मानले जाते. याच दरम्यान, वसंत पंचमी आणि नर्मदा जयंती यासारखे महापर्व देखील येत आहेत. त्यामुळे ही गुप्त नवरात्री आणखीनच विशेष बनली आहे.
गुप्त नवरात्री शुभ मुहूर्त (Gupt Navratri 2022 Shubh Muhurt)
माघ गुप्त नवरात्रीचा प्रारंभ बुधवारी 2 फेब्रुवारी रोजी धनिष्ठा नक्षत्र, वरयाण योग, बव करण आणि कुंभ राशीच्या चंद्रमामधी होत आहे. यावेळी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त 2 फेब्रुवारी 2022 रोजी (बुधवारी) सकाळी 07:10 ते 08:02 पर्यंत आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या