Guru Govind Singh Jayanti 2022: प्रकाश पर्वच्या रुपात साजरी केली जाती गुरु गोविद सिंग जयंती, जाणून घ्या 8 महत्त्वाच्या गोष्टी...
नानकशाही दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात शुक्ल पक्षातील सप्तमीला गुरू गोविंद सिंग यांची जयंती साजरी केली जाते.

Guru Govind Singh Jayanti 2022: शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग यांची जयंती (Guru Gobind Singh Birthday) दरवर्षी ‘प्रकाश पर्व’ (Prakash Parv) म्हणून साजरी केली जाते. नानकशाही दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात (Paush Month) शुक्ल पक्षातील सप्तमीला गुरू गोविंद सिंग यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी गुरु गोविंद सिंग (Guru Gobind Singh) यांची जयंती रविवार, 9 जानेवारी रोजी येत आहे.
Also Read:
गुरु गोविंद सिंग यांचा जन्म पाटणा साहिबमध्ये (Patna Sahib) झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव गुरु तेग बहादुर आणि माता गुजरी असे होते. तेग बहादुर हे शिखांचे नववे गुरु होते. गुरु गोविंद सिंग यांना बालपणीच प्रेमाने सर्व गोविंद राय या नावाने हाक मारत. गुरु गोविंद सिंग हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे महान पुरुष होते. त्यांनी खालसा पंथची स्थापना केली. गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊया…
> इंग्रजी दिनदर्शिकेनुसार गुरु गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी झाला होता. देशभरात गुरु गोविंद सिंग जयंती एक प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते.
>गुरु गोविंद सिंग यांचे 07 ऑक्टोबर 1708 रोजी निधन झाले. मुघलांशी झालेल्या युद्धात ते शहीद झाले. महाराष्ट्रातील नांदेड येथे हजूर साहिब गुरुद्वारा आहे.
> गुरु गोविंद सिंग यांना तीन पत्नी होत्या. त्यांचा पहिला विवाह 21 जून 1677 रोजी त्यांच्या वयाच्या 10 व्या वर्षी बसंतगढ येथे माता जीतोसोबत झाला. त्याला तीन मुलगे होते. जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग.
> यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी गुरु गोविंद सिंग यांचा दुसरा विवाह 4 एप्रिल 1684 रोजी आनंदपूरमध्ये माता सुंदरीसोबत झाला. त्यांना अजित सिंग हा मुलगा झाला.
> आनंदपूरमध्येच गुरु गोविंद सिंह यांचा तिसरा विवाह 15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 वर्षी झाला. माता साहिब देवन या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांनी शीख धर्मात प्रभावी योगदान दिले आहे.
> गुरु गोविंद सिंग यांनी बैसाखीच्या दिवशी खालसा पंथाची स्थापना केली. त्यांनी शिखांसाठी पाच काकर केशरचना, कडा, किरपाण, कांगा आणि कच्चा असणे अनिवार्य केले.
> ‘वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की विजय’, अशी घोषणा गुरू गोविंद सिंग यांनी केली होती. गुरू गोबिंग सिंग यांनी खालसा पंथाच्या रक्षणासाठी त्यांनी मुघलांशी अनेकवेळा वेळा युद्धे केले.
> गुरु गोविंद सिंग यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. त्यांचे चार पुत्र बाबा जोरावर सिंग, फतेह सिंग, अजित सिंग आणि बाबा जुझार सिंग हे देखील हुतात्मा झाले.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या