Guru Govind Singh Jayanti 2022 : अशी साजरी केली जाते गुरु गोविंद सिंग यांची जयंती, जाणून घ्या महत्त्व

गुरु गोविंद सिंग जयंती या वर्षी 09 जानेवारी 2022 रोजी साजरी केली जात आहे. त्यांचा जन्म दिवस प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो. गुरु गोविंद सिंग हे 10 वे आणि शेवटचे शीख गुरू (shikh guru) होते.

Published: January 8, 2022 9:20 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Guru Govind Singh Jayanti 2022 : अशी साजरी केली जाते गुरु गोविंद सिंग यांची जयंती, जाणून घ्या महत्त्व
Guru Govind Singh Jayanti 2022 This is how Guru Gobind Singh's birthday is celebrated, know the importance

Guru Gobind Singh Jayanti 2022 : गुरु गोविंद सिंग जयंती या वर्षी 09 जानेवारी 2022 रोजी साजरी केली जात (Guru Gobind Singh Jayanti 2022) आहे. त्यांचा जन्म दिवस प्रकाश पर्व (light festival) म्हणून साजरा केला जातो. गुरु गोविंद सिंग हे 10 वे आणि शेवटचे शीख गुरू (shikh guru) होते. ते वयाच्या 9 व्या वर्षी गुरू म्हणून उदयास आले. गुरु गोविंद सिंग (Guru Gobind Singh) यांना एक निर्भय योद्धा म्हणून ओळखले जाते. त्यांना अध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ म्हणूनही ओळखले जातात. या महान आध्यात्मिक गुरुचा जन्म पाटणा, बिहार येथे गुरु तेग बहादूर आणि माता गुजरी यांच्या पोटी झाला. गुरु गोविंद सिंग यांना अजित सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग असे चार पुत्र होते. (Guru Govind Singh Jayanti 2022: This is how Guru Gobind Singh’s Birth Anniversary is celebrated, know the importance)

Also Read:

लोक श्री गुरु गोविंद सिंग (Shree Guru Gobind Singh) यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. या दिवशी घरात उत्तम जेवण बनवले जाते, लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि गुरुद्वारामध्ये कीर्तनाचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व गुरुद्वारांमध्ये लंगरची व्यवस्था असते.

Guru Gobind Singh Jayanti 2022: तारीख आणि वेळ

गुरु गोविंद सिंह यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी पाटणा साहिब येथे पौष शुक्ल सप्तमीला झाला होता असे मानले जाते. पण इंग्रजी कॅलेंडर, पंचांग तिथी आणि नानकशाही कॅलेंडरमध्ये तारखा वेगळ्या सांगितल्या आहेत. म्हणून पौष शुक्ल सप्तमी हा गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

पंचांगानुसार, या वर्षी पौष शुक्ल सप्तमी 8 जानेवारी 2022 रोजी रात्री 10:42 वाजता येत असून दुसऱ्या दिवशी 9 जानेवारी 2022 रोजी रात्री 11:08 पर्यंत राहील. त्यामुळे यावर्षी 9 जानेवारी 2022 रोजी गुरु गोविंद सिंग जयंती साजरी केली जाणार आहे.

355th Birth Anniversary of Guru Gobind Singh: पौष शुक्ल सप्तमी तिथ‍ी आणि मुहूर्त

गुरु गोविंद सिंग जयंती तिथी (Guru Gobind Singh Jayanti): 09 जानेवारी 2022
पौष शुक्ल सप्तमी तारीख आरंभ : 8 जानेवारी 2022 रोजी रात्री 10:42 वाजता
पौष शुक्ल सप्तमी तिथी समाप्ती : 9 जानेवारी 2022 रोजी रात्री 11:08 वाजता

शीख योद्धा समुदाय खालसाची स्थापना

गुरू गोविंद सिंग जी यांनी 1699 मध्ये शीख योद्धा समुदाय खालसाची (Sikh Warrior Community Khalsa) स्थापना केली आणि पाच सिद्धांत स्थापित केले. या सिद्धांतांना शीख धर्मात अत्यंत महत्त्व आहे. गुरु गोविंद सिंग जी यांनी घालून दिलेल्या तत्त्वांमध्ये पाच ‘क’चा समावेश आहे. यामध्ये केश (न कापलेले केस), कांघा (लाकडी कंगवा), कारा (लोखंडी किंवा स्टीलचे ब्रेसलेट), कृपाण (तलवार किंवा खंजीर) आणि कचेरा (लहान अंडरपॅंट) यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 9:20 PM IST