Top Recommended Stories

Pradosh Vrat Puja Vidhi : गुरु प्रदोषला करा भगवान शंकराची आराधना, पूर्ण होतील सर्व मानोकामना!

Pradosh Vrat Puja Vidhi :  भगवान विष्णूच्या (Lord Vishnu ) पूजेसाठी एकादशीला (Ekadashi Mahatva ) महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या (Lord Shiva ) पूजेसाठी प्रदोषला महत्त्व (Pradosh Mahatva ) आहे. चैत्र माहच्या (Chaitra Mah ) कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat ) आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी आहे.

Published: April 28, 2022 10:37 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

शिव चालीसा का पाठ
शिव चालीसा का पाठ

Pradosh Vrat Puja Vidhi :  भगवान विष्णूच्या (Lord Vishnu ) पूजेसाठी एकादशीला (Ekadashi Mahatva ) महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या (Lord Shiva ) पूजेसाठी प्रदोषला महत्त्व (Pradosh Mahatva ) आहे. चैत्र माहच्या (Chaitra Mah ) कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat ) आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी आहे. गुरुवारी हा प्रदोष व्रत आल्याने याला गुरु प्रदोष ( Guru Pradosh Vrat ) म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी प्रदोष व्रत ठेवत विधीवत शिवपूजन केल्यास शत्रूपीडा दूर होत सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया या व्रताचा मुहूर्त आणि पूजा-विधी.

प्रदोष व्रत तिथी आणि मुहूर्त

पंचागनुसार 28 एप्रिल रोजी चैत्र माहच्या कृष्ण पक्षातील प्रदोष तिथीला गुरुवारी मध्यरात्री 12:23 पासून प्रारंभ होत आहे. तर शुक्रवार 29 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:26 वाजता प्रदोष तिथी समाप्त होत आहे. त्यानुसार पूजा मुहूर्त 28 एप्रिल रोजी सायंकाळी 6:54 वाजेपासून ते रात्री 9:04 वाजेपर्यंत आहे. सर्वार्थ सिद्धी योग 28 एप्रिल सायंकाळी 5:40 वाजेपासून ते 29 एप्रिल रोजी पहाटे 5:42 वाजेपर्यंत आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:52 ते दुपारी 12:45 वाजेपर्यंत आहे. तर राहूकाळ दुपारी 1:58 ते 3:37 वाजेपर्यंत आहे.

You may like to read

प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक, रुद्राभिषेक आणि शृंगार याला विशेष महत्व आहे. या व्रताच्या प्रभावाने लग्नातील अडथळे दूर होतात. यादिवशी भगवान शंकराचा दुधाने अभिषेक करत फुलांची माळ अर्पण करावी. यामुळे संतान सुख, धन लाभासह करिअरमध्ये यश मिळते. अशा पद्धतीने केलेली पूजा भगवान शंकराला अत्यंत प्रिय असल्याची मान्यता आहे.

अशी करा पूजा

या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून हातात जल, अक्षदा आणि फुल घेत व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरात किंवा घरात बेलपत्र, धूप, अक्षदा, गंगाजल आदीने भगवान शंकराची पूजा केली पाहिजे.  दरम्यान, पंचामृतने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, धोतराचे फुल, कन्हेरचे फुल, धूप, दीप, फळ, पान सुपारी आदी अर्पण करावे. पूजा दरम्यान ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावत शिव चालीसा पाठ करावा. शेवटी भगवान शंकराची आरती करावी.

प्रदोष व्रताच्या दिवशी करू नका हे काम

प्रदोष व्रताच्या पूर्वी तामसिक वस्तूंचे सेवन करू नये. द्वादशीला शाकाहारी भोजन करावे. प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांनी पूजा करताना तुळसी पत्र, केतकीचे फुल, कुंकू, हळद भगवान शंकराला अर्पण करू नये. यासह भगवान शंकराचा अभिषेक शंखने करू नये. प्रदोष व्रत ठेवणाऱ्या भक्तांनी या दिवशी अन्न, मीठ, लाला मिरचीचे सेवन करू नये. यादिवशी पूजेच्या वेळेचे भान ठेवले पाहिजे.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.