Gurupushyamrut Yoga June 2022 : उद्या जुळून येत आहे गुरुपुष्यामृत योग, जाणून घ्या या पुष्य नक्षत्राचे महत्त्व
Gurupushyamrut Yoga June 2022 : उद्या जुळून येत आहे गुरुपुष्यामृत योग, जाणून घ्या या पुष्य नक्षत्राचे महत्त्व
Gurupushyamrut Yoga June 2022 : ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे विशेष महत्त्व आहे. 27 नक्षत्रांपैकी हे आठवे नक्षत्र आहे. गुरुवारी हे नक्षत्र आल्यास सर्वात शुभ असा गुरुपुष्यामृत योग्य निर्माण होतो. या योगात विवाह होत नाहीत, परंतु सोने-चांदी खरेदीसह इतर शुभ कार्ये करणे उत्तम मानले जाते.
Gurupushamrut Yoga June 2022 : वैदिक हिंदू धर्मात (Hindu Dharma) गुरुपुष्यामृत योगाला (Gurupyshyamrut Yoga) विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार वर्षभरात अनेक योग जुळून येत असतात. मात्र गुरुपुष्यामृत योगाला (Gurupushyamrut Yoga Significance) एक वेगळेच अध्यात्मिक महत्त्व आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र (Pushya Nakshatra) येणे म्हणजेच गुरुपुष्यामृत योग. हिंदू धर्मात या योगाला सर्वात शुभ योग मानले जाते. या नक्षत्राला अमृतयोग (Amrut Yoga) देखील म्हटले जाते. कुठल्याही प्रकारच्या शुभ कार्यासाठी हा योग पवित्र मनाला जातो. त्यानुसार उद्या म्हणजेच 30 जून रोजी गुरुपुष्यामृत योग (Gurupushyamrut Yoga June 2022) जुळून येत आहे. या दिवशी सोने खरेदी, नवीन व्यवसाय सुरु करणे, गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. या दिवशी गुरुची सेवा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होत सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.
गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी साधक लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री यंत्राची पूजा करतात. यासह श्रीविद्या मंत्राची सिद्धी करतात. तसेच या दिवशी ज्ञानप्राप्तीसाठी सारस्वत मंत्राचा जप केला जातो. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे विशेष महत्त्व आहे. 27 नक्षत्रांपैकी हे आठवे नक्षत्र आहे. या नक्षत्रात विवाह होत नाहीत, परंतु सोने-चांदी खरेदीसह इतर शुभ कार्ये करणे उत्तम मानले जाते.
गुरुपुष्यामृतसह जुळून येत आहे हे योग
पंचांगानुसार गुरुपुष्यामृत योगाला विशेष महत्त्व आहे. 30 जून रोजी हा योग जुळून येत आहे. या योगासह इतर शुभ योग देखील उद्या जुळून येत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच दिवशी आषाढ महिन्याच्या गुप्त नवरात्रीला सुरुवात होत आहे. गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुरुपुष्यामृत योगासह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, अदल योग, विदाल योग आणि ध्रुव योग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व योग एकाच दिवशी जुळून आल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे. या काळात कोणतेही नवीन कार्य सुरू करणे आणि धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते. वाद मिटवणे, तडजोड करणे आणि नाराज लोकांचे मन वळवणे यासाठी हे योग शुभ ठरतात. एवढेच नाही तर या योगात केलेल्या कामात व्यक्तीला यश मिळते. तसेच जीवनातील संकटं दूर होत सुख-समृद्धी आणि आनंद लाभतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर
लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा
इतरही ताज्या बातम्या
RECOMMENDED STORIES
More Stories
Don’t Miss Out on the Latest Updates. Subscribe to Our Newsletter Today!
Subscribe Now
Enroll for our free updates
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.