Top Recommended Stories

Guruvar Vrat And Puja : गुरुवारचा व्रत असतो अत्यंत महत्वाचा, अशी करा पूजा आणि व्रत!

Guruvar Vrat And Puja : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मीच्या प्रसन्न होण्याने भक्तांच्या कुटुंबात सुख, शांती आणि संपत्तीची कमतरता भासत नाही.

Published: February 23, 2022 5:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Guruvar Vrat
Guruvar Vrat

Guruvar Vrat And Puja : हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित असतो आणि गुरुवारी भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा (Lord Vishnu Pooja) केल्याने ते आनंदी होतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. भगवान विष्णूची पूजा पूर्ण विधीपूर्वक केली पाहिजे. या दिवशी व्रत करण्याचे काही नियम आहेत ज्याबद्दल आपण जागरूक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही देखील गुरुवारी उपवास ठेवत असला किंवा ठेवू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला या उपवासाच्या नियमांची आणि उपासना पद्धतीची (Guruvar puja vidhi) माहिती देत ​​आहोत.

Also Read:

हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मीच्या प्रसन्न होण्याने भक्तांच्या कुटुंबात सुख, शांती आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. भक्तांना यश, सन्मान आणि वैभव प्राप्त होते. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पूजेची पद्धत आणि उपाय याविषयी जाणून घेऊया. (Lord Vishnu Puja: Thursday is the day of Lord Vishnu; Do this pooja ritual)

You may like to read

गुरुवारी भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय –

– तुम्ही जर गुरुवारी व्रत करत तर सकाळी लवकर उठून स्नान करा, ध्यान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.

– पूजेच्या ठिकाणी बसा आणि चौरंगावर भगवान विष्णूची मूर्ती स्थापन करून तिच्यासमोर तुपाचा दिवा लावा.

– त्यानंतर 108 वेळा बीज मंत्राचा जप करावा. ‘ओम बृहस्पताये नमः’

– गुरुवारच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे. पिवळा रंग भगवान विष्णूला खूप प्रिय आहे.

– या दिवशी भगवान विष्णूंला फक्त पिवळ्या रंगाचा टिळा लावावा आणि यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.

– गुरुवारी केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावून त्याची पूजा केली जाते. शक्य असल्यास केळीच्या झाडाजवळ बसून बृहस्पती देवाची कथा वाचली पाहिजे.

– गुरुवारी पिवळ्या रंगाचे भोजन केले पाहिजे.

– नैव्यद्यासाठी गूळ आणि चना डाळीचा प्रसाद बनवावा.

 गुरुवारी करू नका हे काम –

– जर तुम्ही गुरुवारी व्रत करत असाल आणि भगवान विष्णूला प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी केळीचे सेवन करू नका. कारण या दिवशी केळीची पूजा केली जाते.

– गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे.

– गुरुवारच्या उपवासामध्ये मीठ खाऊ नये.

गुरुवार उपवास केव्हा सुरू करावा –

पंचांगानुसार गुरुवारचा उपवास (Thursday’s fast) कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करता येतो. परंतु पौष महिन्यापासून व्रत सुरू करू नये. व्रत सुरू करण्याच्या दिवशी अनुराधा नक्षत्र (Anuradha Nakshatra) तयार झाले तर ते शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे 16 सोमवार व्रत करण्याचे महत्त्व (Guruvar Vrat Importance) आहे त्याचप्रमाणे 16 गुरुवार व्रत पाळण्याचे विधान आहे. त्यानंतर पुढील गुरुवारी व्रताचे उद्यापण केले जाते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 5:00 AM IST