मुंबई : रेशमी आणि दाट केस हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. केसांना रेशमी बनवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे उपचार (Hair treatment ) घेतात. मात्र आपण कोरियन महिलांविषयी विचार केला तर त्या त्यांच्या केसांवर कोणतेही उपचार करत नाहीत तरीही त्यांचे केस रेशमी आणि दाट (Korean Girls Hair) असतात. तुम्हाला कल्पना आहे का की कोरियन महिला त्यांच्या त्वचेसोबतच केसांचीही विशेष काळजी (Hair Care ) घेतात. आज आम्ही तुम्हाला कोरियन महिला कशा प्रकारे केसांची काळजी घेतात (Korean Girls Hair Care Routine) याविषयी माहिती देणार आहोत.Also Read - Hibiscus Hair Packs: केसाच्या समस्येने आहात त्रस्त, मग जास्वंदाच्या फुलांचा हेअर पॅक जरुर वापरा!

स्कॅल्प स्केलर : हा शैम्पूचा एक प्रकार आहे. यामुळे केस मजबूत होतात. केसांना स्कॅल्प स्केलर लावा आणि 10 मिनिटांनंतर एखाद्या शैम्पूने केस स्वच्छ धुवा. Also Read - Milk Conditioner: दूधापासून असे तयार करा कंडिशनर, केस खूपच चमकदार आणि मऊ होतील!

कंडिशनर : केसांना शैम्पू लावल्यानंतर कंडिशनर वापरा आणि 2 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. हे केसांच्या मुळांवर लावू नका Also Read - Malai Hair Mask: सिल्की आणि स्मूद केसांसाठी या 3 पद्धतीने वापरा मलई, असा तयार करा हेअर मास्क!

हेअर मास्क : केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा.

अॅप्पल सायडर व्हिनेगर : अॅप्पल सायडर व्हिनेगर केसांसाठी खूप फायदेशीर असतं. कोरियन महिला त्यांच्या केसांवर केवळ अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करतात. केस धुण्याआधी 5 मिनिटांपूर्वी त्या केसांना अॅप्पल साइडर व्हिनेगर लावतात. यामुळं केसांच्या स्कॅल्पची पीएच पातळीस संतुलित राहते.

केसांची काळजी घेण्याचे इतर उपाय

– डोक्यावर तेल लावून आपल्या बोटांनी हळुवार मालिश करावी. मालिश केल्यामुळं डोक्याच्या त्वचेचं रक्ताभिसरण सुरळीत होतं. डोक्याची मालिश साधारण 10 ते 15 मिनिटे करावी. हाताच्या तळव्याने डोकं रगडू नये. त्यामुळे केस तुटण्याची भीती असते.
– केसांना मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या वाफाळता टॉवेल दोन ते तीन मिनिटे डोक्याभोवती गुंडाळून ठेवावा. यामुळं तेल डोक्यात व्यवस्थित मुरते. असं करताना टॉवेलचं तापमान मध्यम ठेवा. खूप जास्त गरम टॉवेलमुळं केसांना इजा होऊ शकते.
– केस धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. थंडीच्या मोसमात देखील गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्याने केस दुबळे, शुष्क आणि रखरखीत होतात. तसेच केस गळायला सुरवात होते.