Top Recommended Stories

Hanuman vrat : मंगळवार हा श्री हनुमानाचा दिवस, जाणून घ्या महत्त्व आणि व्रत विधी

Hanuman vrat : हिंदू धर्मात 33 कोटी देवदेवता आहेत अशी मान्यता आहे. त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवासाठी निश्चित करण्यात आला आहे. आठवड्यातील या दिवसांपैकी मंगळवार हा श्री हनुमान आणि माता दुर्गा यांचा दिवस मानला जातो.

Updated: January 25, 2022 1:03 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Hanuman vrat : मंगळवार हा श्री हनुमानाचा दिवस, जाणून घ्या महत्त्व आणि व्रत विधी
Mangalvar vrat Importance Tuesday is the day of Shri Hanuman, know the importance and vrat ritual

Hanuman vrat : हिंदू धर्मात 33 कोटी देवदेवता आहेत अशी मान्यता आहे. त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवासाठी निश्चित करण्यात आला आहे. आठवड्यातील या दिवसांपैकी मंगळवार हा श्री हनुमान (Shree Hanuman) आणि माता दुर्गा (Mata Durga) यांचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की मंगळवारी व्रत (Mangalvar vrat) केल्यास जीवन शुभ होते. नारद पुराणानुसार (Narada Puran) मंगळवारी व्रत केल्याने केवळ भीती आणि चिंता दूर होत नाहीत तर शनीची महादशा (Shani Mahadasha) किंवा साडेसातीमुळे (Sadesati) होणारा त्रासही दूर होतो. तसेच जो कोणी मंगळवारी व्रत करून बजरंगबलीला (Bajrangbali) प्रसन्न करतो त्याला इच्छित फळ प्राप्त होते आणि व्यक्ती सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होते अशी देखील मान्यता आहे.

Also Read:

मंगळवार व्रताचे महत्त्व (Mangalvar Vrat Importance)

हनुमानाच्या भक्तांसाठी मंगळवारी व्रत करणे लाभदायक असते. मंगळवारचे व्रत केल्याने कुंडलीत असलेला मंगळ शुभ फळ देतो. या व्रताचे पालन केल्याने धैर्य, भौतिक, सामर्थ्य आणि पुरुषार्थ वाढतो. ज्यांना मांगलिक दोषाचा त्रास आहे त्यांनी हे व्रत अवश्य पाळावे. मंगळवारचे व्रत केल्याने संतती प्राप्त होते व आपत्यांशी संबंधित समस्या दूर होतात. भगवान हनुमानाच्या आपार कृपेमुळे हे व्रत पाळणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. मंगळवारी व्रत केल्यास शत्रूंचा नाश होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. मंगळवारी व्रत केल्यास घर, वाहन इत्यादी सुख प्राप्त होते. ज्यांना हे व्रत सुरू करायचे आहे त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारपासून हे व्रत सुरू करावे. हे व्रत 21 किंवा 45 मंगळवारपर्यंत ठेवले जाते. काही लोक तर आयुष्यभर ठेवतात.

You may like to read

मंगळवार व्रत विधी (Mangalvar Vrat Vidhi)

मंगळवारचे व्रत किमान 21 मंगळवार सलग करावे असे सांगितले जाते. मंगळवारी व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. प्रत्येक मंगळवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान केल्यानंतर व्यक्तीने लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर ईशान्य दिशेला हनुमानजींची प्रतिमा ठेऊन पूजा करावी. हनुमानजींना लाल फुले, सिंदूर, कपडे इत्यादी अर्पण करावे. ज्योत प्रज्वलित केल्यानंतर पूर्ण भक्तिभावाने हनुमानजींसमोर बसून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करावे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 25, 2022 6:00 AM IST

Updated Date: January 25, 2022 1:03 PM IST