Top Recommended Stories

Happy Friendship Day 2022 : नातं मैत्रीचं.. तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिनींना पाठवा मराठी शुभेच्छा...

Happy Friendship Day 2022: आज जागतिक मैत्री दिन अर्थातच इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Friendship Quotes in Marathi फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा, संदेश तेही अस्सल मराठीत.

Updated: July 29, 2022 9:46 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

नातं मैत्रीचं.. तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिनींना पाठवा मराठी शुभेच्छा...
नातं मैत्रीचं.. तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिनींना पाठवा मराठी शुभेच्छा...

Happy Friendship Day 2022: मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्याइतकेच घट्ट असते. पण आपण ठरवलं तर ते रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट बनवू शकतो. त्यामुळे मैत्रीचं नातं हे जगातील सर्व नात्यांच्या पलीकडेचं असतं, असं सांगितलं जातं. एकदा का मैत्रीची रेशीमगाठ बांधली की, मग ते सुटता सुटत नाही.

Also Read:

आज जागतिक मैत्री दिन अर्थातच इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Friendship Quotes in Marathi फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा, संदेश तेही अस्सल मराठीत. तुम्ही आपल्या जिवलग मित्र-मैत्रिनींना अनोख्या अंदाजात फ्रेंडशिप शुभेच्छा देऊन मैत्रीचं नातं आणखी घट्ट करू शकतात.

You may like to read

मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात…

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री….

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे…

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी…

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात…

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही…

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री….

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध,
फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…

हॅप्पी फ्रेंडशिप डे!!!

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या