By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Health Care Tips : मासिक पाळीत असह्य वेदना होताय? शिल्पा शेट्टीने सुचवला रामबाण उपाय
काही मुलींना मासिक पाळीच्या(Periods) वेळी औषधी देखील घ्यावी लागते. मात्र या परिस्थितीत औषधी घेणे घातक ठरू शकते. या वेदनांपासून बचावासाठी अनेक उपाय आहे. असे असले तरी तुम्हाला माहीत आहे का? योग (yoga) केल्याने देखील मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती मिळू शकते.

Health Care Tips : दर महिन्यात येणाऱ्या मासिक पाळीमुळे सर्व महिला त्रस्त (Pain in Periods) असतात. काही मुलींना ही वेदना फारच कमी होते तर काहींना जास्त होतो. काही मुलींना मासिक पाळीच्या(Periods) वेळी औषधी देखील घ्यावी लागते. मात्र, या परिस्थितीत औषधी घेणे घातक ठरू शकते. या वेदनांपासून बचावासाठी अनेक उपाय आहे. असे असले तरी तुम्हाला माहीत आहे का? योग (yoga) केल्याने देखील मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती मिळू शकते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने याबाबत एका व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने असे काही योगासन सांगितले आहे की, ज्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. व्हिडीओद्वारा अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने काही साधे योगासन सांगितले आहे. ज्याच्या अभ्यासाने दिलासा मिळू शकतो. यासह व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये देखील खास टिप्स दिल्या आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या शिल्पा हिने आपल्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेर केला आहे.
अभिनेत्री म्हणाली दररोज करा योग…
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने व्हिडिओला कॅप्शन देत म्हटले आहे की, मासिक पाळीच्या वेदना दर महिन्याला अनेक महिन्यापर्यंत सहन करणे सोपी गोष्ट नाही. विशेतः जेव्हा तुमच्याकडे खूप जबाबदाऱ्या असतात. अशात जर तुम्ही दररोज योग करत असाल तर तुम्हाला अशा परिस्थितीत वेदनांपासून सुटका मिळू शकते. योगासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने या आधी देखील योग संदर्भातील अनेक व्हिडीओ शेअर केले आहे.
Trending Now
योगासनाने स्नायू करतात व्यवस्थित काम…
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सांगितले की, योगासन रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम आणि पोटातील स्नायूंचे कार्य अधीक चांगल्या प्रकारे करते. ज्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.
बॉलिवूडमधील फिट अभिनेत्री…
अभिनेत्री शिल्पा शिट्टी ही बॉलिवूडमधील मोजक्याच अशा कलाकारांमधून एक आहे जी तिच्या सुंदरतेसह फिटनेसमुळे कायम चर्चेत राहते. वाढत्या वयात देखिल स्वतःला फिट आणि शेपमध्ये कसे ठेवायचं याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिल्पा शेट्टीकडे बघितले जाते. शिल्पा ही योग अभ्यासक असून ती फिटनेसबाबत सोशल मीडियावर नेहमीच जनजागृती करत असते. सोबत फॅन्सना फिटनेस टिप्स देखील देत असते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या