Omicron Symptoms: सावधान! तुमची त्वचा, ओठ आणि नखांमध्ये निळा रंग दिसल्यास दुर्लक्ष करू नका
ओमिक्रॉनला सौम्य म्हणणे धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

कोरोनाचा (Coronavirus New Variant) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron) आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. देशात ओमिक्रॉनचा (Omicron Covid-19 Variant) विळखा वाढत चालला आहे. 26 राज्यांमध्ये 3000 पेक्षा अधिक ओमिक्रॉनबाधितांची (India Positivity Rate) नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद झाली आहे. ओमिक्रॉन हा सौम्य दिसत आहे, असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु, ओमिक्रॉनला सौम्य म्हणणे धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.
Also Read:
कोरोनाचा व्हेरिएंट ओमिक्रॉनची लक्षणे (News Omicron Symptoms) इतर प्रकारांपेक्षा सौम्य आहे, परंतु आपण सतर्क असले पाहिजे. तरच आपण ओमिक्रॉनचा प्रसार रोखू शकतो. ओमिक्रॉनची लक्षणे देखील वेगवेगळी आहेत. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नये. तुमची त्वचा, ओठ, नखांमध्ये निळा रंग दिसल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांना दाखवा. तुम्हाला उपचारांची गरज आहे, असा इशारा अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोलच्या (CDC) विशेषज्ज्ञांनी दिला आहे.
सेंटर फॉर डिजीज कंट्रोलच्या आरोग्य तज्ज्ञांनुसार, तुमची त्वचा, ओठ आणि नखांमध्ये निळा, पिवळा आणि राखाडी रंग दिसल्यास निष्काळजीपणा करू नका. निळा रंग दिसणे म्हणजे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे, असे विशेषज्ज्ञांनी म्हटले आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, अशी लक्षणे दिसल्यास तुम्हाला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अशा लोकांनी ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. मात्र, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, कर्कश आवाज, रात्री घाम येणे, स्नायू दुखणे आणि नाक वाहणे याआधी ओमिक्रॉनची अनेक लक्षणे समोर आली आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनच्या तीन प्रमुख लक्षणांमध्ये उच्च तापमान, सततचा खोकला आणि चव आणि गंधात बदल यांचा समावेश आहे.
लसीकरणावर दिला जात आहे भर…
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनापासून सुरक्षिततेसाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच बूस्टर लस हा देखील एक महत्त्वाचा पर्याय असल्याचे विशेषज्ज्ञांनी सांगितले आहे. अस्वस्थ वाटत असेल तरी देखील त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
दरम्यान, ओमिक्रॉनबाधित रुग्णसंख्ये झपाट्याने वाढ होत आहे. परंतु एक दिसालादायक बाब म्हणजे, बहुतांश रुग्ण घरीच बरे होत आहेत. डेल्टा व्हेरियंटबाधित रुग्णांप्रमाणे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत नाही आहे. म्हणजेच हा विषाणू डेल्टाच्या तुलनेत सौम्य आहे. परंतु लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या