Top Recommended Stories

Health Tips: उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या भागाला लावा तेल, होतील अनेक आश्चर्यकारक फायदे!

Health Tips: उन्हाळ्यात पायांच्या तळव्याची मालिश केल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरमी होतेच त्यासोबत इतर शारिरीक त्रास देखील होतो. दिवसभराचा थकवा घालवायचा असेल, थकवा दूर करायचा असेल किंवा तणावाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पायांच्या तळव्यांना मसाज करणे खूप उपयुक्त ठरते.

Published: April 28, 2022 4:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

oil massage for feet
oil massage for feet

Health Tips : बऱ्याच लोकांना हिवाळ्यात (Winter) शरीराला उबदार ठेवण्यासाठी तसेच रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी पायाच्या तळव्यांना मसाज करण्याची सवयी असतो. पण उन्हाळ्यात त्यांना त्यांची ही सवयी तशीच सुरु ठेवता येत नाही. उन्हाळ्यामध्ये (Summer) सहजा पायांच्या तळव्यांना तेल (feet massage) लावले जात नाही. पण खरं तर उन्हाळ्यात सुद्धा पायंच्या तळव्यांची मालिश केल्याने अनेक फायदे होतात. हे फायदे जर तुम्हाला माहिती पडले तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल.

Also Read:

उन्हाळ्यात पायांच्या तळव्याची मालिश केल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. दिवसभराचा थकवा घालवायचा असेल, थकवा दूर करायचा असेल किंवा तणावाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पायांच्या तळव्यांना मसाज करणे खूप उपयुक्त ठरते. आजचा लेखातून आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पायांच्या तळव्यांना तेलाने मसाज केल्याने नेमके काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत…

You may like to read

पायाच्या तळव्याला मालिश करण्याचे फायदे –

– पायाच्या तळव्याची नियमित मालिश केल्यास निद्रानाशाच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय या मसाजने झोप सुद्धा चांगली येते.

– पायांच्या तळव्याला मालिश करणे देखील तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ उदासीनता किंवा तणावात राहते तेव्हा त्या व्यक्तीला मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत पायांना नियमित मसाज केल्यास तणाव आणि चिंता या दोन्हीपासून मुक्ती मिळते.

– पायाच्या मसाजमुळे सांधेदुखीवरही फायदा होतो. कारण मसाज केल्याने नसा शिथिल होतात आणि शरीरात रक्ताभिसरण वाढते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सांधेदुखीने त्रस्त असाल, तर तुम्ही पायांच्या तळव्यांची नियमित मसाज जरुर करा.

– स्त्रियांना जर मासिक पाळीच्या वेदना किंवा क्रॅम्प्सचा त्रास होत असेल तर ते दूर करण्यासाठी तुमच्या पायाच्या तळव्याची मालिश करा. असे केल्याने लवकर आराम मिळू शकतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 28, 2022 4:00 PM IST