Top Recommended Stories

Health Tips: पावसाळ्यात दूर ठेवा संसर्गजन्य आजार; किचनमधील हे पदार्थ येतील कामी

Monsoon Health Tips: पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासह हवेतून विविध प्रकारचे संसर्ग होतात. मात्र तुमच्या किचनमधील काही घटकांचा उपयोग करून तुम्ही हे संसर्गजन्य आजार दूर ठेऊ शकता.

Published: July 31, 2022 4:40 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

 पावसाळ्यात दूर ठेवा संसर्गजन्य आजार; किचनमधील हे पदार्थ येतील कामी
पावसाळ्यात दूर ठेवा संसर्गजन्य आजार; किचनमधील हे पदार्थ येतील कामी

Monsoon Health Tips: सध्या पावसाळा सुरू आहे. सर्वत्र जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस दाखल झाला आहे. पावसासोबतच हिरवागार निसर्ग आणि वाहती हवा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचा हा ऋतू आहे. मात्र या ऋतूत काही संसर्गजन्य आजार (monsoon diseases) डोकं वर काढतात. त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या (Monsoon Health Tips) निर्माण होतात. पावसाळ्यामुळे ताप, सामान्य सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासह हवेतून विविध प्रकारचे संसर्ग होतात. मात्र तुमच्या किचनमध्ये असलेल्या काही पदार्थांचा (kitchen ingredients) उपयोग करून तुम्ही हे संसर्गजन्य आजार दूर ठेऊ शकता.

आले (Ginger)

तुमच्या किचनमध्ये असलेले आले देखील आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. पावसाळ्यात सर्दी, घसा खवखवणे आणि खोकल्याच्या समस्येशी लढण्यासाठी आले हा सर्वात प्रबावी घटक आहे. आल्यातील अँटीइम्फ्लामेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारते आणि तणाव व चिंता कमी होते. तुम्ही चहामध्ये थोडे आले ठेचून टाकू शकता आणि पावसासोबत त्याचा आनंद घेऊ शकता.

You may like to read

लसूण (Garlic)

तुमच्या किचनमध्ये लसूण देखील असाच एक सुपरफूड आहे. लसणामध्ये असलेला अॅलिसिन नावाचा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. यामुळे पावसाळ्यात लसूण खाल्ल्याने विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांपासून आपले संरक्षण होऊ शकते.

जिरे (Cumin seeds)

तुमच्या किचनमधील जिरे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रक्तसंचय दूर करण्यासाठी आणि श्लेष्मा पातळ करण्यासाठी जिरे खूप उपयोगी असतात. सर्दी झाली असेल तर तुमच्या डाळीत भरपूर जिरे घाला. याशिवाय तुम्ही उकळत्या पाण्यात एक किंवा दोन चमचे जिरे टाकून शकता आणि ते पाणी एका बाटलीत साठवून दिवसभर पिऊ शकता.

काळी मिरी (Black Papper)

तुमच्या किनचमधील काळी मिरी देखील खूप आरोग्यदायी असते. यातील कार्मिनिटिव्ह घटक आतड्यांतील वायू आणि इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या दूर करण्यास मदत करतात. यात अँटीइम्फ्लामेंटरी, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि ताप कमी करणारे गुणधर्म असतात. काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.


हळद (Turmeric)

हळद ही एक सुपर औषधी वनस्पती आहे आणि ती प्रत्येक घरात उपलब्ध असते. हळदीमध्ये अँटीइम्फ्लामेंटरी, अँटीमायक्रोबायल आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात. त्यामुळे ती आपल्याला संसर्गाशी लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

तुळस (Tulsi, Basil)

भारतातील हिंदू धर्मियांच्या घरांमध्ये तुळशीचे रोप असतेच. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. यात अँटिऑक्सिडंट, अँटीइम्फ्लामेंटरी आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते आणि शरीराची ऊर्जा वाढते. तुळशीचे पाने तुम्ही चावून खाऊ शकता, चहा किंवा पाण्यात घालून सेवन करू शकता.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>