Health Tips : वयाच्या 40 व्या वर्षीही राहा तंदुरुस्त, लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल

वाढत्या वयानुसार लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः वयाच्या 30-40 नंतर महिलांना अनेक समस्यांमधून जावे लागते. अशा परिस्थितीत या वयात तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Published: January 15, 2022 8:57 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Health Tips : वयाच्या 40 व्या वर्षीही राहा तंदुरुस्त, लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
Health Tips Stay fit even at the age of 40, make these changes in lifestyle

Health Tips: वाढत्या वयानुसार लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना (Health problems) तोंड द्यावे लागते. विशेषतः वयाच्या 30-40 नंतर (After the age of 30-40) महिलांना अनेक समस्यांमधून जावे लागते. अशा परिस्थितीत या वयात तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी (Health care) घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला वाढत्या वयातही तंदुरुस्त राहण्यास (Stay fit) मदत करू शकतात. चला जाणून घेऊया… ( Stay fit even at the age of 40, make these changes in lifestyle )

Also Read:

आहारात बियांचा समावेश : वयाच्या 40 व्या वर्षी वेगवेगळ्या बियांचा आहारात समावेश करावा. यामध्ये फायबर, प्लांट प्रोटीन, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये हाडांसाठी फॉस्फरस आणि मॅंगनीज असते. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले झिंक प्रोस्टेट आणि यूरिनरी आरोग्यासाठी चांगले असते.

दही (Yogurt) : दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दह्यामध्ये (curd) चांगले बॅक्टेरिया आढळतात. तसेच दह्याचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते जे हाडांसाठी चांगले असते. दह्याचे नियमित आहारात समावेश केल्यास तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल.

रात्री उशिरा खाणे (Eating late at night) : वयाच्या 40 वर्षांनंतर जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर रात्री लवकर जेवायला हवे. रात्री उशिरा अन्न खाल्ल्याने, ग्लुकोज टॉलरेंस विस्कळीत होते, चरबी जाळणे कमी होते. यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढते जो मधुमेहाचा एक महत्त्वाचा घटक आहे.

व्हिटॅमिन डी (Vitamin D) : हृदय आणि हाडांशी संबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी वयाच्या 40 वर्षांनंतर व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचे हाडं बजबूत राहण्यास मदत होईल.

भाज्या आणि फळांचे सेवन (vegetables and fruits) : हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. हंगामी भाज्यांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. तसेच फळांमध्ये लिंबूवर्गीय फळे खावीत.

(डिस्क्लेमर : लेखात दिलला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 8:57 PM IST