मुंबई : अनियमित दिनक्रम आणि जेवणाकडे दुर्लक्ष केल्यामुळं अनेक पुरुष तरुण वयातच शारीरिक दुर्बलतेचा बळी पडतात. यामुळं कोणतेही कामात पुरुषांचं मन लागत नाही, सतत थकवा जाणवतो. तसेच या समस्येमुळे बर्‍याचदा त्यांना आपल्या जोडीदाराच्या नाराजीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांविषयी (Healthy Foods For Men) माहिती देत आहोत ज्याचं रोज सेवन केल्याने तुम्ही नेहमीच निरोगी राहाल आणि तुमच्यात उत्साह (Energetic Foods For Men) संचारेल.Also Read - Sleep Tips: तुम्हाला रात्री झोप येत नाही का? करा हे पाच उपाय, मिळेल मानसिक शांती

केळी (Bananas Benefits) : केळीमुळं शरीर मजबूत होते. यामध्ये प्रोटीन्स, फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळं केळीचं सेवन केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. रोज सकाळच्या नास्त्यामध्ये तुम्ही केळीचे सेवन करू शकता. Also Read - Health Care Tips : आजपासून तुमच्या चहात करा हा बदल, अजिबात वाढणार नाही वजन

दुध (Milk Benefits) : दुधाचे सेवन केल्याने देखील पुरुषांमधील शारीरिक दुर्बलता दूर होते. दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळं दुधाचे नियमित सेवन केल्याने आपले स्नायू आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळं पुरुषांनी दररोज एक कप दूध प्यावे. Also Read - Drinking Hot Water at night : सकाळी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी प्या एक ग्लास कोमट पाणी, या 4 मोठ्या समस्या होतील दूर

खजूर (Dates Benefits) : खजूर देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात. खजूरचे सेवन केल्याने शरीराला शक्ती मिळते. खजूर दिवसभर आपल्याला उत्साही ठेवण्यास मदत करतात .

अंडी (Eggs Benefits) : पुरुषांनी दररोज एका अंड्याचं सेवन केले पाहिजे. अंडी खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषक घटक आणि ऊर्जा मिळते. यामुळे आपल्याला थकवा येण्याची कोणतीही समस्या जाणवणार नाही.

पालक (Spinach Benefits) : पालकमध्ये व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हा फोलेट आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. आहाराता पालकचा नियमित सामावेश करावा. यामुळे शरीराला पोषक घटक आणि उर्जा मिळते.

बदाम (Almonds Benefits) : बदाम हा उच्च प्रतीचे प्रथिने, फायबर आणि निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. बदाम आपल्या शरीरातला व्हिटॅमिन बीसह उर्जावान ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त यामध्ये असलेलेमॅग्नेशियम स्नायूंचा थकवा देखील दूर करण्यास मदत करतात.