मुंबई : आपल्या शरिरात हृदय (Heart) एक महत्त्वाचा भाग आहे. हृदयाची स्पंदने (Heart beats) जोपर्यंत सुरु आहे तोपर्यंत आपण जिवंत असतो. त्यामुळे हृदय मजबूत (Strong heart) असणे गरजेचे असते. हृदय मजबूत असल्यास शरिरातील इतर अवयवांची प्रक्रिया देखील व्यवस्थित सुरू राहते. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांविषयी माहिती देत आहोत, ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्यास तुमचे हृदय निरोगी (healthy Heart) राहील.Also Read - Foods for Healthy Heart: हृदय निरोगी ठेवण्यासाठी या पदार्थांचं करा सेवन; हृदयाशी निगडीत आजार होतील दूर

सध्याच्या काळात हृदयाशी निगडीत आजार अतिशय सामान्य झाले आहेत. अनेक लोक हृदयविकाराच्या समस्यांचा (Heart problems) सामना करत आहेत. मात्र, योग्यवेळी आहारावर नियंत्रण केल्यास हृदयाच्या आजारांपासून वाचू शकता. तर मग जाणून घेऊयात अशा पदार्थांविषयी जे हृदय मजबूत (foods for healthy and strong heart) ठेवतात. Also Read - Tulsi Milk : चहा नाही रोज प्या तुळशीयुक्त दूध, या त्रासांपासून होईल सुटका

या पदार्थांचे करा सेवन

अक्रोड : अक्रोड (Walnut) एक सुपर फूड आहे. तुम्ही नियमित अक्रोडचे सेवन करत असाल तर हृदयरोग होण्याची शक्यता अतिशय कमी होते. यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रीत ठेऊ शकता. अक्रोडच्या नियमित सेवनाने बीपी देखील नियंत्रित राहतो. त्यामुळे आहारात नियमित अक्रोडचा समावेश करा. Also Read - हृदयासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश; वाईट सवयी सोडा!

जवसाचे बी : जवसाचे बी (flax seeds) म्हणजेच फ्लॅक्स सीड्सचे सेवन हृदयासाठी गरजेचे असते. जवसात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. हे शरिरासाठी अत्यंत उपयुक्त असते. यामुळे हृदय मजबूत होते. त्यामुळे तुमच्या आहारात जवसाच्या बियांचे सेवन नक्की करा.

बदाम : बदाम (Almonds) देखील हृदय मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. ब्लड प्रेशरसारख्या समस्या दूर करण्यासाठी बदामाचे सेवन उपयुक्त ठरते. वैज्ञानिकांच्या मते रोज बदाम भिजून खाल्ल्यास हृदय रोगाच्या समस्या दूर होतात. तसेच, रक्त पेशिंना निरोगी ठेवण्याचे काम देखील बदाम करतात.

टोमॅटो : दररोज आपल्या आहारात सलादच्या माध्यमातून टोमॅटोचे (Tomatoes) सेवन करा. तुम्ही याचे सूप बनवून देखील पिऊ शकता. संशोधनातून समोर आले आहे की, टोमॅटो बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि ब्लड क्लॉटिंगपासून देखील बचाव करते.

पालक : हिरव्या पालेभाज्या विशेषत: पालक (Spinach) हृदय मजबूत ठेवण्यास अतिशय उपयुक्त असते. पालकमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि फायबर असतात. यामुळे तुमचे हृदय मजबूत होते. त्यामुळे तुमच्या जेवणात पालकाचा नियमित समावेश करा.

अंडी (eggs) आणि मासे (fish): अंडी आणि मासे देखील हृदय मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरतात. विषेशत सालमन मासे हृदयासाठी अतिशय उपयुक्त असतात. यात मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अपल्या आहारात मासे आणि अंड्यांचा समावेश करा.

या पदार्थांचे सेवन टाळा

प्रोसेस्ड मीट : प्रोसेस्ड मीट (Processed meat) म्हणजेच प्रक्रिया केलेले मांस हे सॉल्टिंग, स्मोकिंग, डाईंग आणि कॅनिंग अशा अनेक प्रक्रियातून जाते. त्यामुळे ते ह्रदयासाठी हानिकारक असते.

सोया सॉस आणि टोमॅटो केचअप : सोया सॉस आणि टोमॅटो केचअप हे मोठ्या प्रमाणात मीठ आणि सोडियमच्या प्रक्रियेतून जाते. तसेच यामध्ये आर्टिफीशिलय चव आणि प्रिझर्वेटिव्ह टाकण्यात येतात. हे सर्व हृदयासाठी अतिशय हानिकारक असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणआत कॅलरीज आणि कोलेस्ट्ऱाल असतात. यामुळे हृदयाच्या समस्या वाढू शकतात.

तळलेले पदार्थ : तळलेले पदार्थ (Fried foods) हृदयासाठी अतिशय हानिकारक असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल, कँसर आणि ओबेसिटीसह अनेक आजार उद्भवू शकतात. अशा पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करा.

सॉफ्ट क्स : ड्रिंसॉफ्ट ड्रिंक्स (Soft drinks) देखील हृदयासाठी हानिकारक असतात. हे सर्व कमी प्रमाणात सेवन करावे.