(डिस्क्लेमर: लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)
Heart Attack In Winter : हिवाळ्यात सर्वाधिक असतो हार्ट अटॅकचा धोका, या सवयींनी स्वतःला ठेवा सुरक्षित
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका सर्वाधिक वाढतो हे तुम्हाला माहीत आहे का? रिपोर्ट्सनुसार हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते तेव्हा आपली सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय होते आणि कॅटेकोलामाइन्सचा स्राव वाढवू शकते.

Highest Risk Of Heart Attack In Winter : हिवाळ्यात हृदयविकाराचा (Heart Attack) धोका सर्वाधिक वाढतो हे तुम्हाला माहीत आहे का? रिपोर्ट्सनुसार हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते तेव्हा आपली सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम (sympathetic nervous system) सक्रिय होते आणि कॅटेकोलामाइन्सचा स्राव (catecholamine secretion) वाढवू शकते. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते. असे झाल्यास हार्ट रेट, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉलची पातळी तसेच रक्त गोठण्याची (blood clotting) प्रक्रिया वाढू शकते.
Also Read:
कॅटेकोलामाइन्सचा स्राव म्हणजे काय? (What is Catecholamine secretion?)
तुमच्या शरीरात कॅटेकोलामाइन (catecholamine) खूप महत्वाचे आहे. हे मानवी शरीरातील वेगवेगळे प्रकारचे टिश्यू असतात जे काही लिक्विड ड्रॉप करतात. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक ताणतणावाखाली असते तेव्हा तुमच्या पेशींमध्ये काही कॅटेकोलामाइन्स स्रावित होतात. ही सहसा निरोगी शारीरिक प्रतिक्रिया असते परंतु त्याची वाढ हृदयविकारास कारणीभूत ठरते.
रोजच्या सवयींमध्ये करा हा बदल (Habits to Avoid Heart Attack)
हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण म्हणजे ताण घेणे. जितका ताण घ्याल तितका हृदयाचा धोका वाढेल. अशा परिस्थितीत शक्य तितके आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका.
याशिवाय रोज व्यायाम केल्याने तुम्ही फिट राहाल. जर तुम्ही तुमच्या सवयीमध्ये व्यायामाचा समावेश केला तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. यासाठी तुम्ही सायकलिंग, योगासने यांसारख्या इनडोअर व्यायामाचा पर्यायही निवडू शकता.
याशिवाय जास्त मीठ आणि साखरेपासून अंतर ठेवा. शक्य असल्यास सूर्यफूल तेल किंवा मोहरीचे तेल आपल्या आहारात समाविष्ट करा. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या