Top Recommended Stories

Heatstroke Remedies: उष्माघातामुळे होऊ शकतो मृत्यू; वेळीच करा 'हे' काही प्राथमिक उपचार

Heatstroke Remedies: उन्हाळा सुरु झाला असून मार्च महिन्यातच तापमानाचा पारा लक्षणीय वाढला आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुबईने राज्यात 1 एप्रिल 2022 पर्यंत उष्णतेची लाट राहणार असा इशारा दिला आहे. अशात उष्माघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.

Published: March 29, 2022 6:50 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Heatstroke Remedies: उष्माघातामुळे होऊ शकतो मृत्यू; वेळीच करा 'हे' काही प्राथमिक उपचार

Heatstroke Remedies: उन्हाळा सुरु झाला असून मार्च महिन्यातच तापमानाचा ( Summer Temperature) पारा लक्षणीय वाढला आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाचे (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुबईने राज्यात 1 एप्रिल 2022 पर्यंत उष्णतेची (Heat Wave) लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तीव्र तापमाणाच्या या दिवसांमध्ये उष्माघाताचा (SunStroke) धोका नाकारता येत नाही. उष्माघात झाल्यास काय केले पाहिजे याबाबत बहुतांश जणांना माहिती नसते. तुम्हाला देखील याबाबत माहिती नसेल तर काळजी करू नका. या लेखात आपण उष्णमाघात म्हणजे काय? आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतच्या उपाययोजनांविषयी (SunStroke Remedies) जाणून घेणार आहोत.

‘उष्माघात’ म्हणजे काय?

उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानात काम केल्याने शरीराच्या तापमानात वाढ होते. कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने शरीराला मोठ्या प्रमाणात त्रास होतो, यालाच उष्माघात म्हणतात. उष्माघात ही गंभीर अवस्था असून यामुळे मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. उष्माघात झाल्यास शरीरातील थर्मोरेग्युलेशन बिघडून शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. ही अवस्था मृत्यूस देखील कारणीभूत ठरू शकते.

You may like to read

जाणून घ्या लक्षणे?

उष्माघात झालेल्या रुग्णामध्ये काही प्रमुख लक्षणे दिसून येतात. यात थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, पोटात कळ येणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, मळमळ होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्थिरता,  अस्वस्थता आणि बेशुद्धावस्था ही प्रमुख लक्षणे आहे. ही लक्षणे आढळल्यास संबंधीत व्यक्तीवर तात्कळ प्राथमिक उपचार करून तिला रुग्णालयात दाखल करावे.

कसे करावे प्राथमिक उपचार?

उष्माघात झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करताना सर्वात आधी रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे. या खोलीत पंखे, कुलर किंवा वातानुकुलित यंत्रणा असल्यास उत्तम. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, उष्माघात झालेल्या व्यक्तीस ORS किंवा लिंबू सरबत देऊन तात्काळ रुग्णालयात दाखल करावे.

अशी घ्या काळजी

  • उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे.
  • हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, सनकोट, बुट व चपलांचा वापर करावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • आवश्यकता असेल तरच उन्हात बाहेर पडावे. उन्हात जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचे सेवन करा.
  • उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.