Top Recommended Stories

Holi special Recipes : होळीला बनवा केशर बदाम दूध...पाहुणे होतील खूश, जाणून घ्या रेसिपी

होळी पर्व (Holi 2022) हा महत्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी लोकांच्या घरी जात एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर-सत्कार देखील तेवढ्याच उत्साहात केला जातो.

Updated: February 24, 2022 3:09 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Holi special Recipes : होळीला बनवा केशर बदाम दूध...पाहुणे होतील खूश, जाणून घ्या रेसिपी

Holi special Recipes : हिंदू धर्मात होळी पर्व (Holi 2022) हा महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर-सत्कार देखील तेवढ्याच उत्साहाने केला जातो. ‘अतिथी देवो भव’ संस्कृतीचा हा भाग आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना नव-नवीन व्यंजनासह शीतपेय (kesar badam milk) न दिल्यास काहीतरी कमी राहिल्याचं जाणवते. त्यामुळे होळीच्या पर्वाला तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं चांगल्याप्रकारे स्वागत करता यावे. यासाठी एक खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे (Holi special Recipes). 10  मिनिटांत तयार होणाऱ्या या शीतपेयाचे होळीत खास महत्त्व आहे. ‘केसर-बदाम ठंडाई’ (Kesar Badam Thandai) असे या शीतपेयाचे नाव असून जाणून घेऊ या शीतपेयाची रेसिपी.

Also Read:

ही आहे आवश्यक सामग्री…

-बदाम (Almond) दोन तुकड्यामध्ये कापलेले.
-केसर (Kesar) बारीक कापलेली.
-साखर (Sugar)
-दूध (Milk)
-पाणी (Water)
-टरबूज बी (Muskmelon seeds)
-बडीशेप (fennel seed)
-वेलची (Cardamom)
-खस-खस (Khas Khas)
-काळी मिरी (Black Pepper) एक चमचा.
-गुलाबाच्या 5 ते 6 पाकळ्या (Rose Petals)

You may like to read

अशी बनवा रेसिपी…

-सर्वात आधी साखरेचे पाणी उकळावे.
तयार झालेल्या या मिश्रणाला थंड करून घ्या.
-त्यानंतर वर सांगितलेली सामग्री पाण्यत भिजवून ठेवा.
-एक तासानंतर ही सामग्री पाण्यातून काढून घ्या. दरम्यान, सर्वात आधी बदामाची साल काढून घ्यावी.
-थंड झालेल्या साखर आणि पाण्याच्या श्रमात ही सामग्री बारीक करून टाका.
-त्यानंतर या मिश्रणाला रेशमी कपड्याने गाळून घ्यावे.
-गळाल्यानंतर जे मिश्रण शिल्लक राहते ते दुधात मिसळून घ्या.
-आता दुधात वेलची पावडर मिसळा.
अशा प्रकारे 10 मिनिटांत तुमची रेसिपी तयार होते. हे शीतपेय थंडच दिले जात असल्याने दूध फ्रिजमध्येच ठेवावे. चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतर पाहुण्यांना द्या.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 24, 2022 3:08 PM IST

Updated Date: February 24, 2022 3:09 PM IST