मुंबई : गणेशोत्सवामध्ये (ganeshotsav 2021) सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईचे (gaurai) विशेष स्वागत केले जाते. गौराईला तृप्त करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ, नैवेद्य, फराळ तयार केला जातो. गौराईच्या (gauri ganpati) फराळामध्ये बरेच जण चकलीचा समावेश करतात. पण बऱ्याचदा चकली तयार करणे काहींना खूप आवघड वाटते. चकली तयार करण्याचा अनेकांचा प्रयत्न फसतो. अशावेळी आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने चकली कशी तयार करायची याबद्दल सांगणार आहोत. गौराईच्या फराळामध्ये झटपट रव्याची चकली (rava chakali) तयार करा. ही चकली जिभेवर ठेवल्यानंतर विरघळते. अतिशय कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही चकली (rava chakali recipe) तयार होते. ती नेमकी कशी तयार करायची हे घ्या जाणून…Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

रव्याची चकली तयार करण्यासाठी साहित्य –

– एक कप पाणी
– अर्धा कप बारीक रवा
– तीन चमचे बटर
– एक कप तांदळाचे पीठ
– अर्धा चमचा ओवा
– एक चमचा लाल तिखट
– दोन चमचे पांढरे तीळ
– चिमूटभर हिंग
– एक चमचा धने पूड
– एक चमचा हळद
– चवीप्रमाणे मीठ Also Read - Undalkal Recipe: बाप्पासाठी तयार करा चविष्ट कोंकणी पदार्थ उंदलकाल, परफेक्ट रेसिपी घ्या जाणून!

अशी तयार करा रव्याची चकली –

एका कढईमध्ये एक कप पाणी घ्या. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाका. पाण्यामध्ये रवा शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये तीन चमचे बटर टाका. हे सर्व मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. मंद आचेवर दोन ते तीन मिनिटं रवा शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर एका ताटामध्ये रवा काढून घ्या. यामध्ये एक कप तांदळाचे पीठ टाका. अर्धा चमचा ओवा, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे पांढरे तीळ, चिमूटभर हिंग, एक चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाका. आता चकलीचे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. पण सुरुवातीला शिजवलेल्या रव्यामध्येच तांदळाचे पीठ व्यवस्थित मळून घ्या. पाणी लगेच वापरु नका. रव्यामध्ये असलेल्या ओलसरपणामध्येच तुम्हाला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. चकलीचे पीठ मळताना पाण्याचा वापर जास्त करु नये. Also Read - Fortcha Raja 2021: एका क्लिकवर घ्या फोर्टच्या राजाचे दर्शन!

चकलीच्या साच्यामध्ये पीठ घालण्यापूर्वी ते मळून त्याचा व्यवस्थित गोळा तयार करा. हा गोळा चकलीच्या साच्यामध्ये टाकून बटर पेपरवर छोट्या आकाराच्या चकल्या टाका. या चकलीला काटे खूपच चांगले येतात. चकली तयार करताना त्याचे तोंड व्यवस्थित चिकटवून घ्या जेणे करुन चकली तेलामध्ये सुटणार नाही. आता कढईमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये एक एक चकली टाकून मंद आचेवर चांगली तळून घ्या. या प्रमाणात साधारण 20 चकल्या होतात. ही चकली खूपच खुसखुशीत होते आणि खायला देखील खूपच टेस्टी लागते. गौराईसाठी तुम्ही अतिशय कमी वेळात अशाप्रकारे चकली तयार करु शकता.

(साभार: मधुराज रेसीपी)