How To Prevent Ageing: हे 5 उपाय करून पहा, त्वचेवर दिसणार नाही वाढत्या वयाचा परिणाम
एजिंग म्हणजे वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थांबवता येत नाही. परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसण्यापासून टाळू शकतो आणि आपली त्वचा तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

How To Prevent Ageing : एजिंग म्हणजे वृद्धत्व (Ageing) ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थांबवता येत नाही. परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर (Ageing on Skin) दिसण्यापासून टाळू शकतो आणि आपली त्वचा तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आहार, झोप आणि त्वचेची चांगली निगा राखली (How To Prevent Ageing) तर वयाचा प्रभाव त्वचेवर फारसा पडत नाही असे डायटीशियन आणि तज्ज्ञांचे मत आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच पाच गोष्टी (Anti Aging tips) सांगत आहोत ज्यांची तुम्ही दररोज काळजी घेतली तर तुमची त्वचा तरूण आणि सुंदर (Young and Beautiful Skin) ठेवू शकता.
Also Read:
सूर्याच्या तीव्र किरणांपासून संरक्षण : आपल्याला सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते. पण सूर्याच्या किरणांमुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू लागते. या काळ्या डागांमुळे त्वचेवर पिगमेंटेशन आणि सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे SPF 30 असलेली सन्सक्रीम वापरा. एवढं नाही तर तुम्ही घरी असताना किंवा ढगाळ वातावरणात असतानाही सन्स्क्रीम वापरू शकता. यामुळे वृद्धत्वाची निशाण कमी दिसतात. सन्सक्रीम लावण्याव्यतिरिक्त पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, सनग्लासेस घाला आणि टोपी वापरा. हे तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवेल.
भरपूर झोप : जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा त्या काळात तुमची त्वचा स्वतःला दुरुस्त करते. झोपेच्या वेळी त्वचेमध्ये रक्त प्रवाह वाढतो. यामुळे सुरकुत्या आणि वयाचे डाग दिसत नाहीत. म्हणूनच तुम्हाला किमान सात ते नऊ तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांना चांगली झोप येत नाही त्यांची त्वचा चांगली नसते आणि अशा लोकांच्या त्वचेवर वयाचा प्रभाव लवकर दिसू लागतो.
निरोगी अन्न खा : तरुण त्वचेसाठी निरोगी अन्न ग्रहण करा. हिरव्या भाज्या, भोपळी मिरची, ब्रोकोली, गाजर इत्यादींचा आहारात समावेस करा. याशिवाय डाळिंब, ब्लूबेरी, एवोकॅडो या फळांचाही आहारात समावेश करा. दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्या आणि जेवणात सामान्य तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईलचा समावेश करा.
मॉइश्चरायझर : जसजसे वय वाढू लागते तसतशी त्वचा कोरडी होते. कोरडेपणामुळे त्वचा लवकर वृद्ध दिसू लागते. म्हणूनच तुमच्या त्वचेला नेहमी मॉइश्चराइज ठेवणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेत पाणी टिकवून ठेवते आणि बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसण्यापासून प्रतिबंधित करते. त्वचेवर व्हिटॅमिन सी असलेले मॉइश्चरायझर लावा.
त्वचेची काळजी घेणारी उत्पादने हुशारीने निवडा : अँटीएजिंगच्या नावाखाली कोणतेही क्रीम लावू नका. त्याच्या घटकांवर एक नजर टाका. जर क्रीममध्ये एलोवेरा जेल आणि लॅव्हेंडर ऑइल असेल तर ते तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले असेल. त्वचेमध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल्स वाढतात. त्यामुळे वयाचे निशाण अदृश्य होतात आणि त्वचा घट्ट होते. वयामध्ये बदल करणे शक्य नसले तरी त्वचेवरील त्याचा परिणाम नक्कीच कमी करता येऊ शकतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या